महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या मोहिते पाटील यांच्याकडे मागच्या दाराने विधान परिषदेची फक्त आमदारकी ?

स्वतः बबनदादा आमदार, बंधू संजयमामा आमदार, व्याही अरुण लाड आमदार, जावई संग्रामसिंह थोपटे आमदार , एक मुलगा चेअरमन जिल्हा दूध संघ, दुसरा विक्रम पंचायत समिती सभापती, एक पुतण्या धनराज पंचायत समिती सदस्य, दुसरा पुतण्या यशवंत सरपंच, थेट जनतेतून पदावर.

अकलूज ( बारामती झटका )

महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या घराण्यापैकी अकलूजचे मोहिते पाटील घराणे राजकारणामध्ये सुपरिचित आहे. अशा महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या मोहिते पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे विधानपरिषदेची मागच्या दाराने दिलेली फक्त आमदारकी सोडली तर मोहिते पाटील घराण्याकडे थेट जनतेतील तालुक्यातील व जिल्ह्यातील एकही पद नाही. मात्र, माढा विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या घराण्यात व नातेवाईक यांच्याकडे थेट जनतेतील पदांचा खजिना आहे. स्वतः बबनदादा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बंधू संजयमामा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. व्याही अरुण लाड पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. जावई संग्रामसिंह थोपटे भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहे. एक मुलगा रणजीतसिंह सोलापूर जिल्हा दूध संघ चेअरमन झालेला आहे. दुसरा मुलगा विक्रम माढा पंचायत समिती सभापती आहे. एक पुतण्या धनराज पंचायत समिती सदस्य आहेत. दुसरा पुतण्या यशवंत निमगाव ( टें. ) गावचे सरपंच आहेत. बबनदादाच्या घरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, बँका, पतसंस्था, कारखाना, सुतगिरण, जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक पदासंह कितीतरी संस्थांवर चेअरमन आहेत. मोहिते पाटील यांच्याकडे भाजपची मागच्या दाराने विधान परिषदेची फक्त आमदारकी तर बबनदादांच्या परिवाराकडे थेट जनतेतील पदांचा खजिना आहे.

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व माळशिरस तालुक्याचे विकासरत्न माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या घराण्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्व करणाऱ्या घराण्या़पैकी एक म्हणून पाहिले जात होते. मोहिते पाटील यांचा राजकारणात दबदबा होता. यांच्या घराण्याकडे कायम मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा बँक चेअरमन, जिल्हा परिषद अध्यक्ष, पक्षनेते, माळशिरस पंचायत समिती सभापती, उपसभापती, अकलूज गावचे सरपंच अशी अनेक पदे घराण्याकडे कायम राहिलेली आहे. जिल्ह्यात व महाराष्ट्रात राजकीय दबदबा होता. सध्या मोहिते पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीची विधान परिषदेची आमदारकी म्हणजेच पाठीमागच्या दाराने दिलेले पद सोडले तर कोणतेही जनतेतील थेट मानाचे पद नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र कायम राजकारणात स्वर्गीय आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्यापासून आजपर्यंत राजकीय पाण्यात पाहणाऱ्या शिंदे घराण्याकडे थेट जनतेतील पदांचा खजिना आहे. सध्या असणारी शिंदे परिवाराकडून अनेक पदे त्यांची थेट जनतेतील आहेत. यापूर्वीही संघर्षमय राजकीय वाटचालीत संजयमामा शिंदे यांनी जिल्हा बँक चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद मोहिते पाटील यांच्या नाकावर टिच्चून घेतलेले आहे. सध्यातरी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील घराण्यापेक्षा शिंदे घराण्याचे राजकीय वर्चस्व सिद्ध होत आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleBitcoin Btc Profit Calculator
Next articleशेतकऱ्यांनो वीज बिल दुरुस्ती करून घ्या, राजू शेट्टी साहेबांच्या लढ्याला आले यश – संदीप जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here