मुंबई (बारामती झटका)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांची मोठी किंमत कोश्यारीना राजीनाम्याच्या माध्यमातून मोजावी लागली. महाराष्ट्रातील जनतेनी राज्यपालांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला. सध्या महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ तेव्हाच्या बेरार प्रांतातील रायपूर मध्ये झाला. तर शालेय शिक्षण भोपाळ येथे झाले. रमेश बैस यांची कारकीर्द पहिली तर ते बीजेपीचे ज्येष्ठ नेते आहेत. १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद होते. या कालावधीत बैस यांनी पोलाद खाणी, रसायन आणि खते, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन अशा खात्याचं राज्यमंत्रीपद सांभाळलं. त्यानंतर २०१९-२१ मध्ये त्रिपुराचे राज्यपाल, २०२१ पासून झारखंडचे राज्यपाल आणि आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng