नाथाआबा लवटे पाटील यांनी नवनाथ जगताप यांचा पराभव केला.
मेडद ( बारामती झटका )
मेडद तालुका माळशिरस ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत नाथाआबा लवटे पाटील यांनी नवनाथ जगताप यांचा चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत 36 मतानी पराभव केलेला आहे. नाथाआबा यांचे काका असणारे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांनी नवनाथ जगताप यांच्या पाठीशी राजकीय ताकद उभी केलेली होती तरीसुद्धा पुतण्या नाथाआबा लवटे पाटील यांचा देदीप्यमान विजय झालेला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या यांच्या राजकीय लढाईत काका नेहमी सरस ठरलेले आहेत मात्र मिळत ग्रामपंचायत पोट निवडणुकीत पुतण्या सरस ठेवलेला आहे.
मेडद गावामध्ये मोहिते पाटील समर्थक व विरोधामध्ये लवटे पाटील आणी झंजे असे गट आहेत. थेट जनतेतील सरपंच निवडणुकीच्या वेळी लवटे पाटील आणि झंजे गट एकत्र येऊन मोहिते-पाटील गटाविरुद्ध निवडणूक लढलेले होते. त्यावेळेस थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच युवराज झंजे झालेले होते. 13 ग्रामपंचायत सदस्य पैकी 7,6,2 असे सदस्य निवडून आलेले होते लवटे पाटील व झंजे गटाचे शेवटच्या वर्षी सरपंच पदाचा राजीनामा झंजे यांनी देऊन लवटे पाटील गटाचा सरपंच करावयाचे होते मात्र थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक महा विकास आघाडी सरकारने रद्द केलेली असल्याने ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यामधून सरपंच करावयाचे होते त्यावेळेस नाथाआबा लवटे यांना सदस्य होण्याकरिता वार्ड क्रमांक पाच मधील महादेव काळे यांनी राजीनामा दिला रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक सुरू झाली त्यावेळेस पार्टीचे प्रमुख बाळासाहेब लवटे पाटील आणि उमेदवार नाथाआबा लवटे पाटील यांच्यामध्ये कुठे माशी शिंकली याची गावातील नेते कार्यकर्ते यांना माहित नाही नाथाआबा यांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून नवनाथ जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांना समर्थन बाळासाहेब लवटे पाटील यांनी दिले. प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली जाहीर सभा झालेल्या नाहीत मात्र कॉर्नर बैठक किंवा गप्पा मारत असताना आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे नाथाआबा आणि नवनाथ जगताप यांच्यामधील निवडणुकीचे स्वरूप काका-पुतण्याच्या राजकीय लढाईमध्ये आले. प्रभाग क्रमांक पाच वार्डातील मतदार बाळासाहेब लवटे पाटील यांच्या विचाराचे होते त्यामुळे नवनाथ जगताप यांना मतदान पडलेले होते. वार्डातील माहिती पाटील गटाच्या विरोधी असणाऱ्या लोकांनी बाळासाहेब लवटे पाटील यांच्या भूमिकेवर आक्षेप ठेवून नाथाआबा यांच्या पाठीशी मतदार राहिले सदरच्या वर्गामध्ये धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने नाथाआबा लवटे पाटील यांना समाजाची मते मिळाली. नाथाआबा यांच्या पाठीशी सरपंच युवराज झंजे प्रतापराव झंजे, पोपटराव लवटे पाटील व असंख्य युवक कार्यकर्ते यांनी एका बाजूला असलेल्या मातब्बर नेत्यांचा पराभव केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng