महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमुळे माळशिरस तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा दौरा रद्द – संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुर्द भाजपचा दौरा आयोजित करण्यात आलेला होता.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हातात घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या वळणावर आलेले आहे. त्याचे पडसाद ग्रामीण भागावर देखील उमटलेले आहेत‌. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमुळे माळशिरस तालुक्यातील खुर्द भाजपच्या पदाधिकारी यांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर तीन दिवसाचा दौरा आयोजित केलेला होता. सदरचा दौरा पुढे ढकलण्यात आलेला असल्याचे भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख पुढे बोलताना म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटील, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस तालुका युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भाजपचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण उर्फ पिनु माने, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांच्यासह भाजपचे आजी माजी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व निष्ठावान आजी-माजी पदाधिकारी यांचा माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तीन दिवसाचा दौरा आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी व इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करावयाची होती. तीन दिवसाच्या दौऱ्याचे नियोजन झालेले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागलेले असून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा अच्छे दिन येणार असल्याने माळशिरस तालुक्यातील नेते व पदाधिकारी यांचा दौरा पुढे ढकलला असल्याचे संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख यांनी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्रात “पुन्हा देवेंद्र” या फलकाने लक्ष वेधून घेतले…
Next articleचि.सौ.कां. काजल पवार, इस्लामपूर आणि चि. संग्रामसिंह सावंत, इचलकरंजी यांचा शाही शुभविवाह संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here