महाराष्ट्रातील काका पुतण्या यांच्या राजकीय लढाईचे माळशिरस तालुक्यात मेडद ग्रामपंचायतमध्ये पडसाद

मेडद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काका बाळासाहेब लवटे पाटील व पुतण्या नाथाआबा लवटे पाटील यांच्यात राजकीय लढाई.

मेडद ( बारामती झटका )

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या यांच्यातील राजकीय लढाई महाराष्ट्राने पाहिलेली आहे. माळशिरस तालुक्यात त्याचे पडसाद मेडद ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत उमटले आहेत. मेडद ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत पुतण्या नाथाआबा लवटे पाटील उभे असताना काका माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व भैरवनाथ विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब लवटे पाटील यांनी विरोधी गटासोबत हात मिळवणी करून मोठे आव्हान पुतण्याच्या विरोधात उभे केलेले आहे.

मेडद गावामध्ये पांडुरंग जगताप, शिवाजीराव तुपे व बाळासाहेब लवटे पाटील असे दोन राजकीय गट आहेत. अनेक वेळा दोन्हीही गटाकडे सत्ता होती. थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडीमध्ये युवराज झंजे सरपंचपदी विराजमान झाले होते. राजकीय समीकरणे जुळविण्याकरता एक वर्षाकरिता नाथाआबा यांना सरपंच करावयाचे ठरलेले होते.

सध्या महाराष्ट्र शासनाचा थेट जनतेतील सरपंच पदाला विरोध असल्याने ग्रामपंचायत सदस्य होऊन सरपंचपदी विराजमान होता येत आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक पाच मधील महादेव काळे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि सदर जागेची पोट निवडणूक सुरू झालेली आहे. नाथाआबा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या विरोधात नवनाथ जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जगताप गटाच्या उमेदवारास बाळासाहेब लवटे पाटील यांनी समर्थन देऊन प्रचारास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात काका-पुतण्यांच्या राजकीय लढाईस मेडदमध्ये सुरुवात झालेली आहे.पांडुरंग जगताप गटाचे पार्टी प्रमुख दादासाहेब जगताप, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीआबा तुपे, ग्रामपंचायत सदस्य विजय तुपे, डॉ. जितेंद्र राजाराम तुपे, मामू तुपे, हरिदास जगताप यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, ज्येष्ठ नेते शंकर काळे, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, माजी सरपंच सचिन उर्फ धुळा लवटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल लवटे अशी सर्व मुरब्बी ज्येष्ठ मंडळी नवनाथ जगताप यांचा प्रचार करीत आहेत. तर नाथाआबा यांचा विद्यमान सरपंच युवराज तात्या झंजे, त्रिमूर्ती केसरी वस्ताद प्रतापराव झंजे, माजी सरपंच हौसाबाई लवटे, महानमल्ल पोपटराव लवटे प्रचार करीत आहेत.दोन्ही पार्ट्यातील ज्येष्ठ मंडळी एकत्र आलेले आहेत. सर्वांनी मिळून नवनाथ जगताप यांचा प्रचार सुरू केलेला आहे. नाथाआबा लवटे यांच्या प्रचारात युवकांचा मोठा सहभाग आहे.

मेडदमध्ये नेते एकीकडे तर जनता दुसरीकडे असे राजकीय स्वरूप निर्माण झाले आहे. मेडद ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत काका की पुतण्या कोण वरचढ ठरणार याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. काकाच्या राजकीय तालमीत पुतण्या तयार झालेला आहे. त्यामुळे पुतण्या भारी पडणार का ? काका नवीन डाव टाकून पुतण्याला वरचढ ठरणार ? पुतण्याचे वजन 130 किलो आहे, त्यांनी राजकीय वजन सुद्धा वाढवलेले आहे. त्यांना युवराजतात्या झंजे, प्रतापराव झंजे, लक्ष्मणासारखा बंधू पोपटराव लवटे व गावातील अनेक युवक मदतीला आहे. त्यामुळे मेडद ग्रामपंचायतला वजनदार सरपंच मिळणार का ? संधी हुकणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांना वार्ड क्रमांक चार मधील मतदारांचा वाढता पाठींबा.
Next articleप्रतिकुल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण केलेले मांडकी गावचे सुपुत्र युवा उद्योजक शत्रुघुनशेठ रणनवरे – दादासाहेब हुलगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here