महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा सत्तेचा हुकमी एक्का रामदास आठवले बी. टी. शिवशरण


श्रीपुर ( बरमाती झटका )


आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्ष चालवत असताना युवकांना संघटित करुन सामाजिक राजकीय वाटचालीत आपलं वैशिष्ट्य जपणारे एक सदाबहार सर्वमान्य लोकप्रिय व्यक्तीमत्व नेतृत्व म्हणून ज्यांना देशपातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या एकंदरीत सामाजिक राजकीय तसेच दलित पँथरचे संस्थापक सदस्य ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी वाटचाल वाटते तेवढी सोपी नाही देशातील युवकांचे संघटन करुन त्यांना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव व सद्यकालीन राजकीय सामाजिक विचारधारा त्यांच्यात बिंबवणे ही कसोटी व किमया धुरंधर कुशल संघटक प्रभावी नेतृत्व असलेले रामदास आठवले हेच करु शकतात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार व त्यांना अभिप्रेत असलेली सामाजिक राजकीय संघटन शक्ती आठवले यांच्या नेतृत्वात आहे हे मान्य करावे लागेल त्यांच्या रिपब्लिकन पक्षा बरोबर महाराष्ट्रात जो कोणी राजकीय पक्ष निवडणूक युती करतो त्याला सत्ता मिळते रामदास आठवले जिकडे असतात तिकडे सत्तेची खात्री असे राजकीय समीकरण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे सत्तेचे हुकमी एक्का अशी ओळख रामदास आठवले यांची झाली आहे आठवले हे सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते यांचे आवडते राजकीय हिरो असलेले नेते आहेत एवढी त्यांची लोकप्रियता आहे दिल्ली गाजवणारा महाराष्ट्रियन तरुण तडफदार शीघ्र कवी एवढीच त्यांची ओळख नाही तर अनेक समस्या प्रश्न अडचणी सोडवून समाजहितोपयोगी धोरण कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवून आपले नेतृत्व गाजविणारे एकमेव महाराष्ट्रातील ते केंद्रीय मंत्री आहेत त्यांची सर्वपक्षीय नेत्यांबरोबर सलगी तर आहेच परंतु प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमात समारंभात आठवले यांना आग्रहाचे निमंत्रण प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातं एकुण आठवलेंच्या लोकप्रियतेचा लाभ संबंधित कार्यक्रम संयोजक राजकीय पक्ष घेत असतात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नेते यांचे आठवले आयडाल आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांना त्यांच्या पक्षात काम करणे ही पर्वणी वाटते रामदास आठवले यांचे नेतृत्वाखाली असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे काम करणारे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जो मान सन्मान रुबाब असतो तो एखाद्या आमदार जिल्हा परिषद सदस्य यांचें पेक्षा कमी नसतो रामदास आठवले नावाचे वादळं गल्ली ते दिल्ली घोंगावत आहे आंबेडकरी विचारधारा असलेला निळा झेंडा आपल्या सशक्त खांद्यावर घेऊन कार्यकर्ते नेते यांना सन्मान देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे रामदास आठवले आहेत दलित पँथर पासून समाजाच्या प्रश्नांवर अनेक सामाजिक राजकीय आंदोलनात सहभाग घेऊन नेतृत्व करणारे आठवले यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे विषयी अनेक आठवणी अनेक संघर्षमय प्रसंग आहेत त्यांच्या झंझावाती आंदोलनात अनेक पुस्तकं अनेक विशेषांक अनेक ग्रंथ काव्य नाटक निर्माण झाली तरी आठवले यांचे कर्तृत्व नेतृत्व त्यात सामावू शकणार नाही एवढी मोठी त्यांच्या कर्तृत्वाची झेप मोठी आहे ते आंबेडकरी चळवळीचा रिपब्लिकन पक्षाचा इतिहास असलेले सोनेरी पान आहेत देशपातळीवर आठवले यांना विचारांत घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाचा वाटचालीचा यशस्वी टप्पा पार होऊच शकत नाही अशी आठवले यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचिरंजीव अरुण मगर पाटील आणि चि.सौ.का. मेघा जाधव यांचा विवाह धुमधडाक्यात संपन्न होणार.
Next articleगंजगावा येथिल महिला सरपंच फक्त नावाला…! पण पतीराज सरपंच म्हणून फेरी मारतो गावाला…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here