महाराष्ट्रातील समस्त रुपनवर पाटील परिवार यांच्यावतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन


कर्नाटक राज्यातील बदामी येथील कुलदैवत बनशंकरी देवी असणाऱ्या समस्त रुपनवर पाटील यांचा दीपावलीच्या शुभमुहूर्तावर स्नेह मेळावा होणार

माळशिरस ( बारामती झटका )

कर्नाटक राज्यातील बदामी येथील कुलदैवत बनशंकरी देवी असणाऱ्या समस्त रुपनवर पाटील यांचा दीपावलीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी दि. 27/10/2022 रोजी सकाळी 10 वाजता राज आनंद मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे महाराष्ट्रातील खेडोपाडी व शहरांमध्ये राहत असलेले समस्त रुपनवर पाटील परिवार यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन भूमी अभिलेख उपसंचालक विलास रुपनवर पाटील, सुप्रसिद्ध व्याख्याते भाषण क्लास व होम मिनिस्टर निवेदक अनिल रुपनवर पाटील, राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारत सरकार नोटरी ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.

कर्नाटक राज्यात मुळगाव बदामी असणारे रुपनवर पाटील उद्योग व्यवसाय व शेती करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत. माळशिरस तालुक्यात कुरभावी, एकशिव, डोंबाळवाडी, हनुमानवाडी, कारूंडे, फडतरी, लोणंद, मांडवे, कण्हेर, इस्लामपूर, भांब, नातेपुते, फोंडशिरस, पळसमंडळ, इंदापूर तालुक्यातील जांब, चाकाटी, अशा महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रुपनवर पाटील वास्तव्यास आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुपनवर पाटील यांचे वास्तव्य आहे.

विविध क्षेत्रात नोकरी, वकिली, डॉक्टर, प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्र, प्रगतशील शेतकरी, सामाजिक व राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये विखुरलेले असल्याने अनेक बंधू भगिनी यांचा एकमेकांशी परिचय नाही. एकमेकांचा परिचय असणे भावी पिढीसाठी सोयीस्कर होणार आहे, यासाठी दीपावलीनिमित्त समस्त रुपनवर पाटील परिवार यांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून स्नेह मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक विलास रुपनवर पाटील, अनिल रुपनवर पाटील, ॲड. प्रशांत रुपनवर पाटील आणि समस्त रुपनवर पाटील परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्याला आमदार व खासदार राम आणि बलराम यांच्या रूपाने लाभलेले आहेत.
Next articleThe way to select a Top Plank Room Professional

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here