महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांच्या विचारांची तोफ धडाडणार..

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त मामासाहेब पांढरे मित्र मंडळ व अतुल उद्योग समूह नातेपुते यांचा स्तुत्य उपक्रम.

नातेपुते ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बा. ज. दाते प्रशालेचे सभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान शुक्रवार दि. 19/08/2022 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते, ता.माळशिरस येथे मामासाहेब पांढरे मित्र मंडळ व अतुल उद्योग समूह नातेपुते यांच्यावतीने आयोजित केलेले आहे.

महाराष्ट्रामध्ये नितीन बानगुडे पाटील यांची व्याख्याने अनेक ठिकाणी होत असतात. सोशल मीडियावर पाहत असणार्या ग्रामीण भागातील लोकांना प्रत्यक्ष विचार ऐकण्याची मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हजारो लोक एकत्र बसतील, अशी बसण्याची बैठक व्यवस्था आहे. खास करून महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे.

ग्रामीण भागात नितीन बानगुडे पाटील यांच्या विचारांची तोफ धडाडणार आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे मामासाहेब पांढरे मित्र परिवार व अतुल उद्योग समूह नातेपुते यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. आशिष कदम पाटील आणि चि.सौ.कां. कोमल जगताप यांचा शुभविवाह संपन्न होणार.
Next articleमाळशिरस तालुक्यात सामुहिक राष्ट्रगीताने साधु वाण्याची नौका जागच्या जागी थांबली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here