महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याच्या निवड चाचणी स्पर्धेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व माणकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्या सहकार्याने लगबग सुरू

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्राची ६५ वी राज्यस्तरीय अजिंक्य पद अधिवेशन महाराष्ट्र केसरी किताबसाठी सर्वच जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पुणे-पंढरपूर रोड लगत सर्टिफाइड ग्राउंड माळशिरस येथे माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व माणकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्या सहकार्याने अनेक कार्यकर्त्यांची क्रीडांगण बनवण्याची लगबग सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.

सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा तालीम संघाची मीटिंग प्रतापगड धवलनगर येथे आयोजित करण्यात आलेली होती. सदरच्या मीटिंगमध्ये सचिव भरत मेकाले, कार्याध्यक्ष वामन भाऊ उबाळे, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, खजिनदार महादेव ठवरे, माधव भंडारी, रामभाऊ बेणे, मारुती वाकडे, महेश कुलकर्णी, आप्पा साखरे, विलास कंडरे यांच्या बैठकीत निवडक चाचणी माळशिरस शहरांमध्ये देण्याचे सर्वानुमते ठरले. निवड चाचणीचे पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्याकडे कुस्ती निवड स्पर्धेचे आयोजन नियोजन देण्यात आलेले आहे.

शनिवार दि. ३ डिसेंबर व रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. सर्टिफाईड ग्राउंडवर मैदान बनवण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या मल्लांची व्यवस्थित सोय व्हावी, यासाठी लागणाऱ्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन सर्टिफाईड ग्राउंडवर गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मैदानामध्ये एक मॅट व दोन माती आखाडा तयार करण्यात येणार आहे. कुस्ती शौकीन व पैलवान यांना बसण्याकरता ३००० लोक बसतील अशी गॅलरी तयार करण्यात आलेली आहे. २००० हजार लोक खुर्च्यावर बसतील अशी व्यवस्था आहे. प्रमुख मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ ५०० लोक बसतील असे बनवलेले आहे. एकाच वेळी ५००० ते ६००० हजार लोकांना बसण्याची सोय केलेली आहे. आलेले पैलवान व कुस्ती कोच यांच्यासाठी राहण्याची, जेवणाची व इतर सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.

माळशिरस शहरात पहिल्यांदाच भव्य आणि दिव्य नियोजन करण्यात आलेले आहे. सदरचे नियोजन माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतम आबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्ल सम्राट व्यायाम शाळेचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, दत्तात्रय माने सर, एनआयएस कुस्ती कोच वस्ताद महादेव ठवरे, पै. नारायण माने, मुंबई कामगार केसरी ज्ञानेश्वर पालवे, सर्जेराव घोडके, आप्पासाहेब टेळे, हनुमंतराव देशमुख, तात्यासाहेब वाघमोडे, बाबासाहेब माने पाटील, वस्ताद तानाजी रणवरे सर, चेअरमन शिवाजीराव माने, प्रताप माने, युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, पांडुरंग पिसे, खंडूतात्या पवार, सचिन माने, राजाभाऊ माने, बाळासो साळुंखे, अशोक ठवरे, भाऊ गारूळे, अभिजीत केंगार, कालिदास रुपनवर, अविनाश कळसुले, शुभम माने, शंकरराव मिसाळ, ओम सुतार पाटील आदी मंडळी परिश्रम घेऊन मैदानाची तयारी करून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभागचा उप अभियंता पदाचा श्री. आर. एस‌. रणनवरे यांच्याकडे प्रभारी पदभार.
Next article‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२३’ मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here