माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षनेते दिलीपबापु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना गट नं. 2 शाखेचा पहिला वर्धापन दिन संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे उद्धाटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, महाळुंग नगरपंचायतचे नगरसेवक नानासो मुंडफणे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, माळशिरस तालुका अध्यक्ष नगरसेवक सुरेश टेळे, सचिव लक्ष्मण नरुटे यांच्याहस्ते झाले.
पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 2 दिवसाचे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यात महिलांसाठी हिमोग्लोबिन, सर्व प्रकारच्या रक्तातील टेस्ट, मोफत ई – श्रम कार्ड शिबिर, तसेच डॉ. सागर निटवे ( MD ) यांच्यामार्फत मोफत पाईल्स, मुतखडा, यांची तपासणी तसेच, पुणे येथिल सुप्रसिद्ध एच.पी. देसाई हॉस्पिटल यांच्यामार्फत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास गावकऱ्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाखा प्रमुख आकाश शिंदे, राजेंद्र भोसले, रामा धंगेकर, अनिल कांबळे, हनुमंत कांबळे, पृथ्वीराज इंगोले आदिंनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng