मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन शाखा उद्घाटन व जिल्हा परिषद पंचायत समिती आढावा बैठक संपन्न
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांचा मानसन्मान, महिलांची हिमोग्लोबिन चाचणी व महारक्तदान शिबिर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे व पदाधिकारी यांनी आयोजित केलेले होते. सदर कार्यक्रम मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झालेला होता. कार्यक्रमानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आढावा बैठक संपन्न झाली. त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. पिंपरी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा आप्पासाहेब कर्चे पंचायत समितीसाठी प्रबळ दावेदार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी संपन्न झाली. यामध्ये पंचायत समिती निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा आप्पासाहेब कर्चे प्रबळ दावेदार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांच्या धर्मपत्नी सौ. मनीषा कर्चे आहेत. आप्पासाहेब यांनी माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाळे निर्माण केले आहे. गाव व वाड्यावस्त्या या ठिकाणी मनसैनिक तयार केलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माळशिरस नगरपंचायतमध्ये सौ. रेश्माताई सुरेश टेळे यांनी मनसेचा झेंडा फडकविला आहे. आगामी पंचायत समितीमध्ये सौ. मनीषा कर्चे यांच्या रूपाने पंचायत समितीमध्ये मनसेचा झेंडा फडकण्याच्या तयारीत माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कामाला लागलेले या आढावा बैठकी वरून दिसून येत होते. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस दोन पक्षाची ताकद आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेईल यावरून दोन्ही पक्षाचे भवितव्य राहणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. जर दोन्ही पक्षातील नेतेमंडळींनी मनसेला जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारीमध्ये योग्य स्थान दिल्यास आघाडी करण्यास तयार असल्याचा सूरही आढावा बैठकीत निघालेला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी पूर्ण ताकतीने तालुक्यातील उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आढावा बैठकीत सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng