महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची निवड


नातेपुते( बारामती झटका)

महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुकाध्यक्षपदी एकमताने पत्रकार प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांची निवड करण्यात आली.ही निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.महाराष्ट्र पत्रकार संघ गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. दरवर्षी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटात घेतला जातो.दरवर्षी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यकारिणी राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांचा अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात येत असते. याहीवर्षी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये माळशिरस तालुका कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत पुन्हा एकदा पत्रकार संघामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल प्रमोद शिंदे यांना तालुका अध्यक्ष पद देण्यात आले आहे.निवडीनंतर प्रमोद शिंदे म्हणाले की राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात पत्रकारांसाठी चांगल्याप्रकारे काम करून पत्रकारांना शासकीय विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार तसेच निर्भिड पत्रकारांवरील होणारे हल्ले व अन्याय सहन केला जाणार नाही.प्रामाणिक निर्भीड पत्रकारांच्या पाठीमागे महाराष्ट्र पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहणार असल्याचं सांगितले. तसेच उमेश पोतदार (तालुका उपाध्यक्ष),प्रशांत खरात (तालुका सचिव), भगवान घोगरे (खजिनदार) गणेश कळमकर (अकलूज शहराध्यक्ष), यांच्या निवडी करण्यात आले आहेत. या निवडीबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य संपर्कप्रमुख ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर यांनी सर्वांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंजीवन फाउंडेशन ने दिला अपंगांना आधार अपंगांना साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रम जोपासला
Next articleतरंगफळ गावच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करा – आ. रणजितसिंह मोहिते पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here