नूतन प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांचा वाफेगावचे युवा नेते शहाजीराजे विष्णू गाडे यांच्यावतीने सन्मान
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणालदादा नितीन राऊत यांची भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल वाफेगावचे सरपंच विष्णू जगन्नाथ गाडे यांचे चिरंजीव शहाजीराजे विष्णू गाडे यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांचा सन्मान केला. यावेळी नितीन चव्हाण, वैभव चव्हाण, पप्पू इंगळे, किशोर गाडे, मनोज शिंदे, सत्यजित काळे आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणालदादा यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी 548 267 अशा भरघोस मतांनी निवड झालेली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. युवा नेते शहाजीराजे गाडे यांनी नुतन युवक प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांचा सन्मान केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng