शिखर शिंगणापूर (बारामती झटका)
तसं पाहिलं तर संपूर्ण हिंदुस्थानात जिथं जिथं प्राचीन किल्ले, गड, घाट, मंदिरं आहेत तिथं तिथं, येणाऱ्या भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी बारव निर्माण केल्याचे दिसून येते. पण, हल्ली मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यांमूळे त्यांची उपयुक्तता संपली आणि सुंदर असे हे बारव दूर्लक्षित झाल्याचे दिसून येते. इतिहास पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्रातील जून्या पुष्करणी, बारव (विहीरी) स्वच्छ करून तिथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिपोत्सव करण्याचे मंगेश दिक्षित वा त्यांच्या टीमने ठरविले.

शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी अनेक छोटे-मोठे घाट आहेत. यापैकी सातारा सोलापूर हद्दीवरील भवानी घाटातील बारवची स्वच्छता करण्यात आली. या बारवची निर्माण कार्य हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते. सह्याद्री ट्रेकर्सचे आठ सदस्य स्वच्छता मोहिमेवर निघाले. बरोबर एक बादली, खोरे, पाटी, झाडू असे साहित्य घेऊन संध्याकाळी सव्वासहा वाजता स्वच्छतेस सुरुवात केली. अर्धा तास स्वच्छतेनंतर छान रांगोळी काढून संपूर्ण बारवेवर २२१ दिवे प्रज्वलित करून संपूर्ण परिसर उजळून निघाला. नंतर फूले, हार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng