सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, कंपनीचे डायरेक्टर कुणाल मराठे, खंडू गायकवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती.
अकलूज ( बारामती झटका )
अकलुज ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मंगळवार दि. 10/05/2022 रोजी सकाळी 11 वा. टायझर या रेडीमेड कपड्याच्या अद्यावत शोरूमचे नविन जागेत कॉटनकिंग शेजारी उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे जिल्ह्याचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील, कंपनीचे डायरेक्टर कुणाल मराठे, खंडु गायकवाड, वाफेगावचे मा. सरपंच, उपसरपंच, चेअरमन, डायरेक्टर शिक्षक, नानासो धडांबे, विनायक पराडे, रघुनाथ मिसाळ, गायकवाड परिवार व नातेवाईक, मित्र परिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्टोअर मॅनेजर परशुराम कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
