Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा स्वकर्तुत्वाने जपणारे कुस्तीत मास्टरकी आणि शिक्षणात डॉक्टरकी करणारे ग्रामीण भागातील रांगडं युवा नेतृत्व धवलदादा…

अकलूज ( बारामती झटका )

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी युवा नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा स्वकर्तृत्वाने जपणारे ग्रामीण भागातील रांगडं युवा नेतृत्व धवलदादा आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष या पदावर डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काम केलेले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा घेऊन स्वकर्तुत्वाने धवलदादांनी आपले कर्तृत्व कॉलेज जीवनापासून सिद्ध केलेले आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये मास्टरकी आणि शिक्षणामध्ये डॉक्टरकी मिळवणारे ग्रामीण भागातील एकमेव डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील युवा नेतृत्व आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिवतीर्थ आखाड्याची निर्मिती केलेली आहे. अनेक मल्ल त्यांनी घडविलेले आहेत. त्यांच्या पश्चात शंकरनगर अकलूज येथे त्रिमूर्ती केसरी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक मल्ल आपले कौशल्य दाखवत असतात.

सहकार महर्षींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्रिमूर्ती केसरी मैदानामध्ये दैदीप्यमान कुस्ती केलेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी मैदानामध्ये डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान केलेला होता. धवलदादांनी शिक्षणामध्ये काळ्या आईची सेवा करण्याकरता जैविक शास्त्रामध्ये पीएचडी पदवी संपादन केलेली आहे. अशा किचकट विषयांमध्ये डॉक्टरकी मिळवणारे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहिल्यांदाच अकलूजसारख्या ग्रामीण भागात महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना बहुमान मिळालेला आहे. आजपर्यंत शहराच्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झालेल्या आहेत. धवलदादा यांनी योग्य व नेटके नियोजन केलेले होते महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्यातील व राज्याबाहेरून आलेल्या वस्ताद मंडळींची, मल्लांची, कुस्ती शौकिनांची सोय चांगल्या पद्धतीने करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा पारदर्शक केलेली होती.

तत्कालीन महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव याने महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर एकाच वाक्यात सांगितले होते, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या योग्य नियोजन व निपक्षपाती निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला, असे उद्गार त्यावेळी काढलेले होते.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रामदास तडस, सरचिटणीस पदी काकासाहेब पवार, वरिष्ठ उपाध्यक्षपदी विजय बराटे, कार्याध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उपाध्यक्षपदी हनुमंतराव गावडे, वैभव लांडगे, संजय तीर्थक, दीपक पवार, सुनील चौधरी, संजय चव्हाण, खजिनदार संजय शेटे, सहसचिव विलास कथुरे, मारुती आडकर, अनिल पांडे, वामन गाते, गोरखनाथ बलकवडे, रवींद्र पाटील, कार्यकारी समिती सदस्य योगेश दोडके, संदीप भोंडवे, दिलीप ईटणकर, ज्ञानदेव जाधव, सुनील देशमुख यांच्याही बिनविरोध निवडी करण्यात आल्या‌. सर्व नवनिर्वाचित व नूतन पदाधिकारी यांना बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून भावी कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort