पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची राज्य कार्यकारीणीची बैठक शनिवारी ११/१२/२०२१ रोजी डोणजे सिंहगड, पायथा, पुणे येथे पार पडली. या सभेस महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश कडूस पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर बैठकिचे स्वागताध्यक्ष म्हणुन गोर्हे येथील मा. सरपंच तथा युवा प्रमुख सेना पुणे श्री. सचिन पासलकर हे होते. संघटना राज्यध्यक्ष नितीन धामणे व राज्यसचिव हरिश्चंद्र काळे यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांचे सर्वच स्तरावरील अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे तसेच राज्यातील कृषी पदवीधर, इतर पदविधर-कृषी पदविका-इतर पदविका- १०% मधील – १२ वी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सर्व बांधवाना सामावून घ्यावे, असे आवाहन केले. राज्यातील सर्व ग्रामसेवकांना वेतनत्रुटी, तांत्रिक दर्जा, जुनी पेन्शन मिळणे याबाबत कृषी पदविधर ग्रामसेवक संघटना कटिबद्ध आहे, असे सांगितले.

सदर विषयांवर कार्यकारीणीने सर्वानुमते मान्यता दिली. आता राज्यातील सर्व ग्रामसेवक संवर्गाला संघटनेचा नियमित सभासद होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
प्रस्थापित संघटनेच्या नेतृत्वाच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे व योग्य पद्धतीने मंत्रालयीन स्तरावर मा. उच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित राज्यातील अत्यंत जोखमीचे काम करणारे सर्व ग्रामसेवकांचा वेतनत्रुटी प्रश्न योग्य पद्धतीने मांडून पाठपुरावा न केल्यामुळे अद्यापर्यंत प्रलंबित आहे. सदर प्रश्न कृषी पदविधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातुन सोडवावा, अशी राज्यातील बहुतांश संवर्गबांधवांची मागणी असल्यामुळे व संवर्गाचे अतोनात होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आगामी काळात सर्वांना सोबत घेवुन हा प्रश्न प्राधान्याने सोडवु असे सांगितले. या अगोदर कंत्राटी ग्रामसेवकांचा कालावधी ५ वर्षावरुन ३ वर्षावर आणणे, २००५ पुर्वी कंत्राटी रुजु झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागु करणे, वेतन त्रुटी न्यायालयीन लढा उभारून संवर्गाला न्याय मिळणेकामी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. संवर्ग हिताची महत्वाची मागण्यांबाबत राज्याध्यक्ष श्री. नितिन धामणे यांनी न्यायालयाच्या माध्यमातुन सोडविण्याचे काम कोणत्याही संघटनेत कोणतेही पद नसताना केले असून आता राज्याध्यक्ष या पदावर असल्याने वेतनत्रुटीचा प्रश्न देखील सर्वांच्या सहकार्याने मार्गी लागेल, असा विश्वास राज्य सचिव हरिश्चंद्र काळे यांनी व्यक्त केला.

सदर बैठकिस पुणे विभागीय अध्यक्ष हनुमंत वगरे, सुदाम बनसोडे, महेंद्र निकम, महिलाध्यक्षा प्रतिभा पवार, गुलाब सावंत, जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल, सातारा जिल्हाध्यक्ष नारायण पवार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेश सौदागर, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, सचिव कुशाबा इंगले, प्रेमदास पवार, अभिजित ताड, सुनिल पारडे, विकास चव्हाण, राहुल गांगर्डे, अतुल राठोड, बाळासाहेब भोईटे, रमेश पवार, विलास देंगे, शरद जाधव दत्तात्रय भोजणे, नितीन कापसे, अनूप श्रीवास्तव, श्री. कोकाटे, श्री. सोंगे, प्रसिद्धीप्रमुख शिवकुमार देशमुख, विठ्ठल सुर्यवंशी, राज्य संपर्क प्रमुख गुलाब वडजे यांच्यासह पुणे, सातारा, सोलापुर, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, जळगाव इ. जिल्ह्यातुन दोनशेच्यावर पदाधिकारी ग्रामसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस कडूस पाटील व अध्यक्ष नितीन धामणे आणि इतर पदाधिकारी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. ग्रामसेवकांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न सोडविणे, शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर करणे, ग्रामसेवक यांना तांत्रिक दर्जा देणे यांसह अनेक मागण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष श्री. महेश कडुस पाटील यांनी दिले.
सदर बैठकिचे आयोजन पुणे जिल्हा कार्यकारीणीने सिंहगड पायथ्याजवळ केले होते. यावेळी उपस्थितांचे आभार श्री. नवनाथ झोल, पुणे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng