सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य घडशी समाज कल्याणकारी संघटनेच्यावतीने उत्कृष्ट कलाकारांना यांना राम कृष्ण हरी फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येत आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा कदम, पुणे जिल्हा कार्यवाह संतोष पवार, कोल्हापूरचे कार्यवाह किरण धुमाळ, खरसूंडी येथील तूषार्थ साळुंखे, नातेपुते येथील विकी भोसले यांचे उपस्थित उत्कृष्ट कलाकार सौ. वंदना अशोक साळोखे सनई चौघडा, सेक्सोफोन वादक अशोक साळोखे, श्रीकांत साळोखे उत्कृष्ट संगीतकार तसेच हार्मोनियम वादक, तबला वादक अशा घडशी समाजातील उत्कृष्ट कलाकारांना राम कृष्ण हरी फाउंडेशनच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्कृती कला मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मिळणारे मानधन या प्रमाणपत्रामुळे लवकर मिळण्यास मदत मिळते आणि सर्व कलाकार यांचा मेळावा आणि चर्चासत्र शासन दरबारी असलेले प्रलंबित मागण्याबाबत लवकरच समारंभ घेण्यात येईल. घडशी समाजाबाबत असलेल्या उनिगा या कलाकारांच्या समस्या, समाजातील समस्या, उद्योगधंद्यासाठी कर्ज व्यवस्था, नोकरी विषय समस्या, सामाजिक परिस्थिती, धार्मिक कार्याबाबत उत्सुकता, शैक्षणिक समस्या या सर्व बाबीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तरुण तरुनींना घटनेत चांगल्या पदावर घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविणार असल्याचे सांगून राज्याचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng