मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघात श्री. कल्याणराव काळे यांची बिनविरोध निवड झाली. हा संघ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे. मागील ४० वर्ष या संघात माळशिरस तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळत असायचं, पण यंदा माळशिरस तालुका सोडून पंढरपूर तालुक्यातील युवा चेअरमन यांना संधी दिलेली आहे.

त्यामुळे शंकर बचावचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील व ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुनील गोरे साहेब यांच्याहस्ते श्री. कल्याणराव काळे यांचा सत्कार करण्यात आला व तालुका व जिल्हा राजकारणाची चर्चा झाली. माळशिरस तालुक्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र साखर संघात वगळल्याबद्दल सविस्तर चर्चा झाली व कल्याणराव काळे यांना पुढील साखर संघाच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच साखर संघाचे चेअरमन पद श्री. कल्याणराव काळे यांना मिळावं म्हणून रमेश पाटील हे साहेबांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
