महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने फडतरी येथे शेतकरी मेळावा संपन्न

फडतरी (बारामती झटका)

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि आधिकारी सर्जेराव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी कृषि पर्यवेक्षक उदय साळुंखे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग लागवडीची सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. कृषि सहाय्यक रणजित नाळे यांनी डाळिंब मृग बहार व्यवस्थापन मररोग व्यवस्थापन पिन व्होल बोरर व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक दत्तात्रय पांढरमिसे यांनी मकेवरील लष्कर अळीचे एकात्मिक नियत्रंण व खरिप हंगामातील सर्व पिकांच्या बिजप्रक्रिया या विषयावर माहिती दिली. कृषि सहाय्यक विजय कर्णे यांनी ऊसातील हुमणी नियत्रंणाची माहिती सागितली. कृषि सहाय्यक विश्वनाथ दुधाळ यांनी निर्यातक्षम फळ पिक नोंदणी व GI मानांकन नाव नोंदणी याविषयी माहिती दिली. महाडिबीटीवरील सर्व योजनांची माहिती कृषि सेवक कांतीलाल शेंडगे यांनी दिली

शेतकरी मेळाव्यामध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवप्यात आले. MREGS फळबाग लागवड योजनेचे अर्ज घेण्यात आले. सदर कार्यक्रमास सरपंच प्रियंका निटवे, उपसरपंच दुर्योधन पाटील, पोलिस पाटिल दिलिप लवटे, मा. सरपंच अजिनाथ रुपनवर, मा. उपसरपंच आप्पासाहेब रुपनवर, सोसायटी चेअरमन अर्जुन रुपनवर, ग्रामसेवक व्होळ, भाऊसो तलाठी, अंभग भाऊसाहेब आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. सदर केले तरशेतकरी मेळाव्याचे नियोजन कृषि सहाय्यक नवनाथ गोरे यांनी तर रुपनवर भाऊसाहेब यांनी आभार प्रदर्शन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाविकास आघाडीने शेतकऱ्यांची चिपाडासारखी अवस्था केली – माजी खासदार राजू शेट्टी
Next articleतिरवंडी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन संतोष सरगर व संचालक यांचा सन्मान संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here