महाराष्ट्र सरकारचा गोरगरिबांसाठी आनंदाचा शिधा, मात्र फसवणूक झाल्याने ऐन दिवाळीत शिमगा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या आनंदाचा शिधा योजनेचा बोजवारा

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याकरता शिधा धारक असणाऱ्या लोकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा त्यामध्ये चणाडाळ एक किलो, रवा एक किलो, साखर एक किलो, पाम तेल एक किलो अशा वस्तूंचे किट बनवून महाराष्ट्रातील जनतेला वाटण्याचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात सुरू झाला. जनतेला सरकारच्या या योजनेचा फायदा होईल असे वाटत असताना आनंदाचा शिधा योजनेचा बोजवारा उडालेला आहे. महाराष्ट्र सरकारचा गोरगरिबांसाठी आनंदाचा शिधा मात्र, सर्वसामान्य जनतेची व गोरगरिबांची फसवणूक झाल्याने ऐन दिवाळीत सरकारच्या नावाने शिमगा सुरु झालेला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार होते. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदार सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलेले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महाराष्ट्रातील अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना काही निर्णय घेतलेले होते, ते निर्णय बदललेले आहेत. सर्वसामान्य जनता व गोरगरीब यांच्यासाठी दीपावली सण आनंदाने करता यावा यासाठी शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा ही संकल्पना राबवून सदरच्या आनंदाचा शिधा पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे फोटो आहेत. सदरच्या किटवर साखर एक किलो, चना डाळ एक किलो, रवा एक किलो, पामतेल एक किलो अशा चार वस्तू शंभर रुपयांमध्ये तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटण्यासाठी शासनाकडून आलेल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी चार वस्तू ऐवजी तीन वस्तू आहेत तरीसुद्धा शंभर रुपये घेतले जातात. काही ठिकाणी दोनच वस्तू आहेत, पन्नास रुपये घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिधाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

स्वस्त धान्य दुकानदार यांची सुद्धा डोकेदुखी वाढलेली आहे. आनंदाचा शिधा पिशवी हातात घेताना चार वस्तू छापलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला दोन किंवा तीनच वस्तू मिळत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सर्वसामान्य जनता व गोरगरिबांची फसवणूक केलेली आहे. चार वस्तू द्यायच्या नव्हत्या तर जाहीर करायला नको होते. गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. ऐन दिवाळीत सर्वसामान्य जनता व गोरगरिबांचा सरकारच्या नावाने शिमगा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रथमेश कन्स्ट्रक्शनचे उद्योजक देविदास शिंदे परिवाराच्यावतीने कामगारांची दिवाळी गोड केली.
Next article500 Dinar Mortgage loan bad credit sofa Despite Poor credit Right now

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here