महाळुंग गट क्र. 333 मधील भूसंपादन क्षेत्राची नुकसान भरपाईसह धारक संमतीविना दिली – धनाजी विठ्ठल पिसे.

महाळुंग हद्दीतील जमीन गट क्रमांक 333 जमिनीची मोजणी होऊन हद्दी खुणा कायम करण्यासाठी माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल असताना बेकायदेशीर मोबदल्याचे वाटप – गजेंद्र शिवाजी पिसे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 ग बारामती इंदापूर अकलूज बोंडले चौपदरीकरण रस्त्याच्या मोबदल्याचा वाद चव्हाट्यावर.

जमीन भूसंपादन जमीन झाली मात्र कोणाची ? उत्तर अनुत्तीर्ण आहे.

महाळुंग ( बारामती झटका )

महाळुंग ता. माळशिरस येथील गट क्रमांक 333 यामधील जमिनीचे क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 बारामती-इंदापूर-अकलूज-बोंडले श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग चौपदरीकरण रस्त्यासाठी गटातील काही क्षेत्र भू संपादित झालेले आहे. सदरच्या गटातील भूसंपादन झालेल्या क्षेत्राचे नुकसान भरपाई सहधारक यांना संमतीविना बेकायदेशीर वाटप केली असल्याचे पीडित शेतकरी धनाजी विठ्ठल पिसे यांनी सांगितले. तर महाळुंग हद्दीतील संपादित झालेला श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी जमीन गट क्रमांक 333 मधील काही क्षेत्र भू संपादित झालेले आहे.

सदरचे क्षेत्र कोणाचे आहे, याची खातरजमा न करता उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी श्री. भानुदास किसन पिसाळ व श्री. गोरख तुकाराम मोहिते यांचे वारस महानंदादेवी गोरख मोहिते, पूजा गोरख मोहिते, सायली गोरख मोहिते, विशाल गोरख मोहिते यांच्या नावे भूसंपादन क्षेत्राचा मोबदला गेलेला आहे. जमीन गट नंबर 333 क्षेत्राचे मोजणी होऊन हद्दी खुणा कायम करण्यासाठी माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल असताना बेकायदेशीर जमिनीच्या मोबदल्याचे वाटप केलेले असल्याचे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर माळशिरस यांचे न्यायालयात वादी म्हणून असणारे गजेंद्र शिवाजी पिसे राहणार महाळुंग यांनी सांगितलेले आहे.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शमा पवार यांनी श्री. भानुदास किसन पिसाळ व श्री. गोरख तुकाराम मोहिते रा. महाळुंग यांना दि. 12/4/2021 रोजी कार्यालयीन पत्राने कळविले होते. मौजे महाळुंग ता. माळशिरस येथील जमीन गट नंबर 333 मधील भूसंपादन नुकसान भरपाई वाटपाबाबत सदरच्या पत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 ग बारामती इंदापूर अकलूज बोंडले चौपदरीकरण भूसंपादनाचे कार्यवाही मध्ये मौजे महाळुंग तालुका माळशिरस येथील जमीन गट नंबर 333 संपादित होत आहे. तसेच सदर संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम वाटपाचे कामकाज तिकडील कार्यालयाकडून सुरू असून जमीन गट नंबर 333 मधील सह धारक यांच्यामध्ये सहमती होत नाही. तसेच सदर जमिनी गट नंबर 333 मधील सह धारक बाळासाहेब मल्हारी पिसे, अरुण विठ्ठल पिसे व इतर दोन यांची तक्रार असले बाबतचा अर्ज इकडील कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सदर जमिनी गट नंबर 333 मधील तक्रार अर्जाची शहानिशा होईपर्यंत नुकसान भरपाई अर्जावर कार्यवाही करता येणार नाही, असे स्पष्ट उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी पत्र देऊन लेखी कळविले होते. दरम्यान त्यांची बदली सोलापूर येथे झाली.

सदरचे प्रकरण दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी तहसील कार्यालय माळशिरस यांच्याकडे नियम 1971 यातील नियम 31 मध्ये दिलेल्या सूचनेनुसार नमुना नंबर 14 चे अहवालांवर नियम 31 अन्वये वहीवाट प्रकरणी चौकशी करून नियम 29, 30 नुसार चौकशी करून कोणाची वहिवाट रस्त्यालगत आहे. याबाबत खातरजमा करून वस्तुस्थितीदर्शक कच्चा नकाशा पंचनामा हीच संबंधितांचा जबाब घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह संपादित क्षेत्राचे नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे पत्रानुसार तहसीलदार यांनी एकतर्फी अभिप्राय दिल्यानंतर सदरच्या क्षेत्राचे वाटप केले. बेकायदेशीर वाटप केले असल्याचा आरोप गजेंद्र शिवाजी पिसे व धनाजी विठ्ठल पिसे यांनी केलेला आहे.
दिवाणी न्यायालयातील वादी गजेंद्र शिवाजी पिसे यांनी प्रतिवादी 1 ते 36 राहणार सर्व महाळुंग यांचे विरोधात जमीन गट नंबर 333 ची मोजणी होऊन हद्दी खुणा कायम करून मिळणेबाबतची तक्रार आहे‌. तहसीलदार यांनी सदरची जमीन भुमी अभिलेख कार्यालयाकडून प्रत्यक्ष मोजणी करून गटामध्ये असणाऱ्या सर्व पोट खातेदारांना समक्ष बोलावून हद्दी खुणा करून संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला वाटण्याचे आदेश देणे गरजेचे असताना तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय यांनी आमचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान केलेले आहे. सदरच्या सर्व कागदपत्राची माहिती अधिकारामध्ये माहिती मागवलेली आहे. लवकरच माहिती उपलब्ध झाल्यानंतर या प्रकरणात खरे दोषी कोण हे कळणार असल्याचे मत गजेंद्र शिवाजी पिसे व धनाजी विठ्ठल पिसे यांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या दोन्ही चौपदरीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या महामार्गासाठी भू संपादित झालेल्या आहेत. अनेक गरीब व अडाणी शेतकरी यांच्यावर हुशार व पुढारी वशिलेबाज शेतकऱ्यांनी एजंटांमार्फत जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केलेल्या आहेत.

अनेक लोकांच्या जमिनी भुसंपादन झालेल्या असतानासुद्धा काही लोकांच्या संमतीविना मोबदल्याचे पैसे वाटप केलेले आहेत. अशा पीडित शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनीच्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या मोबाईल नंबर संपर्क साधून कागदपत्रासह भेटावे. आपले म्हणणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत, वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडद येथील मातोश्री निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चाय पे चर्चा.
Next articleसदाशिवनगर येथे कोविड योद्धा सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीत लसीकरण संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here