नेत्यांची हुजरेगिरी करण्यामुळे मतदारसंघातील जनतेचा विश्वास घात केलेला असल्याने भ्रमनिरास झाला आहे.
महाळुंग ( बारामती झटका )
महाळुंग जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण तोडकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांचा डीपीसी मधून मिळणारा निधी मतदार संघातील गावे सोडून दुसऱ्या गावात टक्केवारी घेऊन विकला असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल खटके यांनी करून महाळुंग जिल्हा परिषद गटाला निधी विकणारा पहिलाच सदस्य मिळालेला असून नेत्यांची हुजरेगिरी करण्यामुळे मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात केलेला असल्याचा घणाघाती आरोप केलेला आहे.
जिल्हा वार्षिक योजना 3054 -20 81 सन 2020 – 21 अंतर्गत महाळूग जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांनी मतदार संघाच्या बाहेरील गावांमध्ये निधी दिलेला आहे. 1)पिरळे शिवपुरी रस्ता सा. क्र. 0/00 ते 2/00 मध्ये सुधारणा करणे आठ लाख रुपये,2) तिरवंडी ते बंधारा रस्ता साखळी क्रमांक 1/500 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे दहा लाख रुपये,3) तिरवंडी ते सरगर वस्ती रस्ता साखळी क्रमांक 0/00 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे दहा लाख रुपये ,4) ग्रामा 61 ते तिरवंडी ते हजारे बाजारे वस्ती ते वि.मो. नगर साखळी क्रमांक 0/00 ते 1/00 मध्ये सुधारणा करणे दहा लाख रुपये असा 38 लाखाचा निधी दुसऱ्या मतदारसंघात दिलेला आहे.
महाळूग जिल्हा परिषद गटांमधील कोणत्याही गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्य यांनी निधी विकास कामासाठी वापरला असतात तरी चालले असते मात्र मतदार संघाच्या बाहेर निधी देऊन मतदान करणाऱ्या लोकांचा भ्रम निराश केलेला आहे. जिल्हा परिषद गटामध्ये अरुण तोडकर यांच्याविषयी नाराजीचा सूर मतदारांच्या मधून उमटलेला असल्याचे युवा नेते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल खटके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng