महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील गटाचे भाजपने राजकीय आभाळ फाडले, ठिगळं कोठे लावणार ?

राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा रुतण्यापेक्षा, भाजपच्या कमळाच्या पाकळ्या टोचणार का ?

महाळुंग ( बारामती झटका )

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटील यांना अंधारात ठेवून माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अनिल जाधव व अनिल मुंडफणे यांनी त्यांच्या गटातील 13 उमेदवारांना भाजपचे बी फार्म उमेदवारी अर्ज सोबत जोडून भाजपचे अधिकृत उमेदवार झालेले आहेत. मोहिते पाटील यांचे नगरपंचायत निवडणुकीत चार गट होते‌. अंतर्गत वाद न मिटल्याने कोणत्या गटाला दुखवायचे, असा प्रश्न पक्ष निरीक्षक तथा माढा लोकसभा मतदार संघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांना होता. त्यामुळे त्यांनी पुण्याच्या पक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना अहवाल दिला. आघाडी करून लढत आहेत‌. त्यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य व सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस के. के. पाटील यांनी चाणाक्ष राजकारण करून देवेंद्र फडवणीस यांचेकडून बी फार्म उपलब्ध करून 13 उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जोडलेले असल्याने महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील गटाचे भाजपने राजकीय आभाळ फाडले आहे, ठिगळे कोठे लावणार ? असा महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीच्या राजकीय पटलावर प्रश्न उपस्थित झालेला आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा रूतण्यापेक्षा ज्यादा भाजपच्या कमळाच्या पाकळ्या टोचणार ? का असा खोचक सवाल उपस्थित होत आहे.
मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत खेळीला वैतागून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा रूतण्यापेक्षा भाजप पक्षामध्ये प्रवेश करून कमळाच्या मऊ पाकळ्या चांगल्या वाटतील असे वाटले. मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा मतदार संघ व माळशिरस विधानसभा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. यामुळेच भाजपने रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन आमदार केले होते. माळशिरस तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील जे सांगतील ते भाजप ऐकेल असे बोलले जात होते. मात्र महाळूंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील यांना डावलून भाजपने कमळ चिन्हावर उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील यांची राजकीय कोंडी झालेली आहे. इतर तीन गट सुद्धा मोहिते-पाटील यांचेच आहेत. त्यामुळे गटाचा प्रचार करायचा का पक्षाचा प्रचार करायचा, असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप मोहिते पाटील यांचे का ? भाजपमधील विरोधी गट यांचे ? कोणाचे वर्चस्व राहणार ? भाजपमधील खुर्द व बुद्रुक गट उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने मोहिते-पाटील गटाचे राजकीय आभार फाडलेले आहे, ठिगळं कोठे लावणार ? हे तर, निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीच्या वेळी समजणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी आमने सामने दोन वार्डात सरळ सरळ लढत होणार.
Next articleतिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. संदीप जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here