महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रणजीतभैय्या शिंदे, पॅनल प्रमुख राहुल रेडे पाटील, ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांच्या समवेत उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ.

महाळुंग ( बारामती झटका )

महाळुंग श्रीपुर नगरपंचायत ओबीसी आरक्षणामुळे रिक्त राहिलेल्या चार प्रभागासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार शुभारंभ महाळुंगचे ग्रामदैवत यमाई देवी मंदिरामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख ,जिल्हा परिषद सदस्य रणजीतभैया शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव गायकवाड, दादासाहेब लाटे , शिवाजीराव रेडे ,मौलाखान पठाण, विक्रम लाटे रावसाहेब सावंत पाटील उदय माने देशमुख राजेंद्र वाडेकर संजय वाडेकर लीना लोणकर सविता रेडे शारदा पाटील परिसरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात आला .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण होते. धूम धडाका मध्ये वाद्याच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांच्या गर्दीने यमाई देवी मंदिर परिसर फुलून गेलेला होता.

ग्रामदैवत एम आई देवीला श्रीफळ वाढविल्यानंतर गट नंबर 2 येथे प्रचार यात्रा काढण्यात आले त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील प्रचार यात्रा काढण्यात आली. प्रभाग 14 आणि 15 मध्ये पदयात्रा काढण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस प्रचाराच्या गाड्यांना झेंडे स्टिकर डिजिटल बॅनर त्याचबरोबर प्रचाराचे साऊंड अशाप्रकारे गळ्यामध्ये गमजा ,डोक्यावरती घड्याळाचे टोपी असा थाटात प्रचार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून महाळुंग श्रीपुर नगरपंचायती साठी करण्यात आला. प्रभाग क्रमांक 14 व 15 मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी स्पीकरच्या वाहनासह पदयात्रा काढून प्रचारात सुरुवात केलेली होती संपूर्ण परिसर राष्ट्रवादी मध्ये झालेला होता. महाळुंग श्रीपुर परिसरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या नियोजन बद्ध प्रचार शुभारंभ रॅली व पदयात्रा काढली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायतच्या बिनविरोध राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष सौ ताई वावरे यांचा राष्ट्रवादी भवनमध्ये सन्मान संपन्न.
Next articleबेकायदेशीर रस्ता काढणाऱ्या दहिगाव मंडळ अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी – संतोष पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here