महाळुंग – श्रीपुर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार – मौलाभाई पठाण

पवार परिवाराच्या उपस्थितीत ग्रामदैवत यमाई देवीच्या पटांगणामध्ये विजयी उमेदवारांचा सन्मान सोहळा संपन्न होणार.

महाळुंग ( बारामती झटका )

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पहिल्यांदा फडकणार आहे. नगरपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा पवार परिवारातील देशाचे माजी नेते केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे, कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत यमाई देवीच्या पटांगणामध्ये विजयी उमेदवारांचा सन्मान सोहळा संपन्न होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मौलाभाई पठाण यांनी सांगितले.

महाळूंग-श्रीपुर नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, जिल्हा परिषद सदस्य रणजीतभैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख राहुल रेडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणुकीत सतरा प्रभागात सतरा सक्षम उमेदवार उभे केलेले आहे. पहिल्या टप्प्यात 13 उमेदवारांचे मतदान पूर्ण झालेले आहे. सध्या उर्वरित चार उमेदवारांचे मतदान 18 जानेवारी रोजी आहे. मतदारांचा उदंड प्रतिसाद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पहिल्यांदा नगरपंचायतवर फडकणार असल्याचा आत्मविश्वास मौलाभाई पठाण यांनी व्यक्त केला.

महाळूंगचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कुंडलिकभाऊ रेडे पाटील यांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन राहुल रेडे पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीत समविचारी लोकांना एकत्रित करून महाळुंग पंचक्रोशीत अनेक प्रलंबित कामांना वाचा फोडलेली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले यमाई देवी मंदिर परिसर विकासाचा प्रश्न अनेक दिवस वंचित राहिलेला होता. त्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यमाईदेवीच्या सुशोभीकरण व मंदिर विकासाचा प्रश्न सुटलेला आहे. पुरातत्व खात्याने संमती दिलेली आहे. महाळुंग परिसराचा प्रस्तापितांकडून विकास खुंटलेला आहे, त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच उमेदवार विकसनशील आहेत, समाजामध्ये स्थान असणारे आहेत.

भविष्यात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सरकार असल्याने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाळूंग परिसराचा कायापालट करतील, असा विश्वास मतदारांना वाटत असल्याने निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना उदंड प्रतिसाद दिलेला आहे. नियोजनबद्ध प्रचार सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एक दिलाने काम केले आहे. उज्वल भविष्यासाठी मतदारांनी उमेदवारांना साथ दिलेली असल्याने निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा नगरपंचायत फडकणार असून पवार परिवार यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत यमाईदेवीच्या पटांगणामध्ये विजयी उमेदवारांचा सन्मान सोहळा संपन्न होणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मौलाभाई पठाण यांनी व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्रीपुर अकलूज रस्त्याच्या ठेकेदाराने साईड पट्ट्या भरलेत का ? वाहनधारकांना घसरून पडण्यासाठी मुरमाची रांगोळी ?
Next articleमेडद ग्रामपंचायत सरपंच पदाची सोमवारी निवड होणार ? निवडणूक होणार की बिनविरोध ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here