महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहा जागा जिंकून सत्तेचा दावेदार.
महाळुंग ( बारामती झटका )
महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा उमेदवार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेचा दावेदार राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन देणाऱ्या उमेदवारांना सत्तेत वाटा देऊन उमेदवारांना नामदार करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे.
महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत राहुल रेडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सहा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार काँग्रेस आय पक्षाचा एक उमेदवार भीमराव रेडे पाटील गटाचे पाच उमेदवार नानासाहेब मुडफणे गटाचे चार उमेदवार असे सतरा उमेदवार निवडून आलेले आहेत.
सर्वात मोठा गट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपंचायती मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व तीन समित्या यांचे सभापती असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपनगराध्यक्ष व दोन सभापती पदे समर्थन देणाऱ्या उमेदवारांना पदे देऊन नामदार करणार असल्याने गुप्त हालचालीला वेग आलेला आहे दोन्ही गटाचे उमेदवार यांची अधिकृत आघाडी नसल्याने मुक्त निर्णय घेण्यास अडचण येणार नाही.आरपीआयचे सुद्धा दोन उमेदवार निवडून आलेले आहेत. मानाचे पद सन्मानाने मिळत असल्याने कोणते नगरसेवक सुवर्णसंधीचा फायदा घेतील याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. वेळ प्रसंगी लक्ष्मी दर्शन सुद्धा होऊ शकते. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे सध्यातरी फिल्डिंग साठी वाघर लावलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng