महाळुंग श्रीपुर नगरपंचायत वर मोहिते पाटील यांनी कलम केलेल्या कमळाची सत्ता नको, निष्ठावान भाजपच्या मतदारांचा सुर.

मोहिते-पाटील समर्थकांनी सत्ता स्थापन केल्यास भाजपचे लेबल लावू नये, चिन्हाचा अपमान होईल.

महाळुंग ( बारामती झटका )

महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी आपले समर्थक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे करून भाजपचे अस्तित्व संपवून मोहिते पाटील समर्थक यांना नगरपंचायत निवडणुकीत सहकार्य केलेले आहे. निकालानंतर भाजप विरोधात असणारे निवडून आलेल्या सदस्यांना मोहिते पाटील भाजपचेच आहेत असे कोणत्या तोंडाने सांगतात म्हणून महाळुंग श्रीपुर नगरपंचायतवर मोहिते पाटील यांनी कलम केलेल्या कमळाची सत्ता नको निष्ठावान भाजपच्या मतदारांचा सूर आहे तर माहिती पाटील समर्थकांनी सत्ता स्थापन केल्यास भाजपचे लेबल लावू नये चिन्हाचा अपमान होईल असे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
महाळुंग श्रीपुर नगर पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे पक्ष निरीक्षक धैर्यशील मोहिते-पाटील यांची नेमणूक केलेली होती. त्याप्रमाणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बैठक सुद्धा घेतलेली होती मात्र मोहिते पाटील समर्थक तीन ते चार गट असल्यामुळे एकमत होऊ शकत नाही म्हणून मोहिते पाटील यांनी पुणे येथील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा दिलेला होता. त्यावेळेस नातेपुते वगळता माळशिरस व महाळुंग श्रीपुर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा सूर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा होता त्याप्रमाणे महाळुंग श्रीपुर येथील भाजपचे तिकीट घेणाऱ्या सतरा उमेदवारांना बी फॉर्म दिलेले होते. मोहिते-पाटील यांचे दोन गट अपक्ष लढले तिसरा गट भाजपच्या चिन्हावर आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढले गेले.
महाळुंग श्रीपुर निवडणुकीत मोहिते-पाटील यांना पक्षापेक्षा गटाचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात समर्थकांना मतदान करण्याचे फर्मान सोडले होते. भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य अनिल जाधव यांनी उपसभापती निवडीच्या वेळी भाजपचे मोहिते पाटील म्हणून समर्थन दिले होते मात्र नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे पॅनल प्रमुख व उमेदवार यांना मोहिते पाटील यांनी विरोधक समजले. समर्थकांना छुपा पाठिंबा देऊन भाजपचे उमेदवार पराभूत केले आहेत. मोहिते-पाटील यांना स्वतः ची व समर्थकांची ताकत ज्यादा वाटत आहे तर त्यांनी भाजपमध्ये येऊन फुकटात विधान परिषद का ? घेतली असाही सवाल भाजपच्या गोटात उपस्थित होत आहे. धैर्यशील मोहिते-पाटील माढा लोकसभा मतदार संघाचे संघटन सरचिटणीस आहेत त्यांनी महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या एकाही उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ, प्रचाराचे रॅलीत, कॉर्नर बैठकीत उपस्थिती दर्शवली नाही मात्र माळशिरस येथे उपस्थित राहिलेले होते. भाजप मध्ये राहून पक्षातील उमेदवारांशी गद्दारी करणाऱ्या मोहिते पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा व संघटन सरचिटणीस पदाचा राजीनामा द्यावा खुशाल त्यांनी त्यांच्या समर्थकाचे राजकारण करावे. असे महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत भाजप वर प्रेम करणाऱ्या दोन हजार मतदारांची इच्छा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घ्यावी मोहिते पाटील समर्थक यांनी भाजपचे लेबल लावणार नाहीत याची दक्षता घ्यावी लवकरच पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीने धडा शिकवावा असे निष्ठावान भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील खताचा काळाबाजार बंद करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना चाप बसणार – अजितभैया बोरकर.
Next articleप्रजासत्ताक दिनानिमित्त तरंगफळ ग्रामपंचायतीने पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here