उपनगराध्यक्ष रेडे पाटील मात्र भीमराव रेडे पाटील का ? राहुल रेडे पाटील आज ठरणार.
महाळुंग ( बारामती झटका )
महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंगळे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भीमराव रेडे पाटील उर्फ पाटील नाना यांच्या विकास आघाडीच्या लक्ष्मी अशोक चव्हाण यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड होणार आहे, तशी औपचारिक घोषणा बाकी आहे.
महाळुंग श्रीपुर नगरपंचायत 17 सदस्य आहेत त्यापैकी राष्ट्रवादी, काँग्रेस सहा सदस्य, भीमराव रेडे पाटील गट पाच सदस्य, नानासाहेब मुंडफणे गट चार सदस्य, भाजप एक सदस्य, काँग्रेस आय एक सदस्य असे संख्या बलाबल आहे. भीमराव रेडे पाटील गटाच्या लक्ष्मी चव्हाण नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड होण्याची घोषणा बाकी आहे. मात्र, उपनगराध्यक्ष पदाकडे लक्ष लागून राहिलेले आहे. जरी भीमराव रेडे पाटील आणि नानासाहेब मुंडफणे दोन गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, उपनगराध्यक्ष रेडे पाटीलच होणार का ? असा प्रश्न आहे. भीमराव रेडे पाटील का, राहुल रेडे पाटील याचा फैसला आज दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. महाळुंग शब्द उच्चारला की रेडे पाटील नाव येते, त्यामुळे रेडे पाटील गटाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष नाट्यमयरित्या होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng