महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकीत भीमराव रेडे पाटील यांचा दे धक्का

श्रीपूर (बारामती झटका)

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत आज धक्कादायक राजकीय पलटवार पहायला मिळाला. मोहिते पाटील यांचे निष्ठावंत कट्टर समर्थक खंदे कार्यकर्ते तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर उद्योग संचालक भिमराव रेडे पाटील उर्फ पाटील नाना यांनी अचानक राजकीय समीकरण पलटवार करुन नानासाहेब मुंडफणे यांच्या गटाला दे धक्का देऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली आहे. या अचानक झालेल्या राजकीय घडामोडीने माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

भिमराव रेडे पाटील यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील पुरस्कृत यमाई देवी विकास आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाबरोबर युती केली होती. तसेच नानासाहेब मुंडफणे यांनी मोहिते पाटील पुरस्कृत जगदंबा आघाडी करुन नगरपंचायत निवडणूक लढवली होती. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. यामध्ये भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, कॉंग्रेसचा एक व आघाडी करुन लढलेले भिमराव रेडे पाटील यांच्या आघाडीतील पाच व नानासाहेब मुंडफणे यांच्या आघाडीतील चार उमेदवार निवडून आले आहेत. भिमराव रेडे पाटील व नानासाहेब मुंडफणे यांनी एकत्रीत येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली वाटाघाटी चर्चा बैठका झाल्याचे खात्रीलायक वृत्त असताना आज अचानक महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत पदाधिकारी निवडीवेळी राजकीय जादूची कांडी फिरली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी धरून भिमराव रेडे पाटील यांनी उपनगराध्यक्ष पद मिळवलं. नानासाहेब मुंडफणे व भीमराव रेडे पाटील यांच्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद दोन्ही गटात अडीच वर्ष वाटुन घेण्याबाबत एकमत होऊ शकलं नाही, अशी अंदरकी बात असल्याचे बोलले जाते. बाकी काहीही असो भीमराव रेडे पाटील यांच्या धक्कादायक तंत्राने मोहिते पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleछञपती शिवाजी महाराज जयंती व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या वाढदिवसानिमित्त आदर्श विंचुर्णी येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्न
Next articleमहाळुंग श्रीपूर नगरपंचायत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा आरपीआयचे वतीने सत्कार – बी. टी. शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here