महाळुंग श्रीपूर नगरपंचायत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा आरपीआयचे वतीने सत्कार – बी. टी. शिवशरण

महाळुंग (बारामती झटका)

महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व यमाई देवी विकास आघाडी पुरस्कृत सौ लक्ष्मी अशोक चव्हाण यांची व उपनगराध्यक्ष म्हणून पार्टी प्रमुख भिमराव रेडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली या दोघांचे अभिनंदन व सत्कार महाळुंग येथील यमाई देवी मंदिरात आरपीआयचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले यांचें हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले सरचिटणीस मिलिंद सरतापे आरपीआय युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष राजरत्न नाईकनवरे आरपीआयचे युवक श्रीपूर अध्यक्ष विश्वजीत भालशंकर संजय भोसले इत्यादी उपस्थित होते महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा होण्याचा बहुमान आरपीआयचे एबी फार्म घेऊन निवडून आलेल्या नुतन नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण यांचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब व राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांनी भ्रमणध्वनी करुन शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे भिमराव रेडे पाटील यांना आरपीआयचे वतीने त्यांच्या आघाडी बरोबर युती असल्याने पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आरपीआयचे माध्यमातून सुचवलेल्या विकासकामांना प्राधान्य देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाळुंग-श्रीपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकीत भीमराव रेडे पाटील यांचा दे धक्का
Next articleवेळापूर येथील पालखी चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त लाईट डेकोरेशन चौकाचे खास आकर्षण ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here