महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतने घन कचरा उचलण्याचे काढलेले टेंडर रद्द करण्याची गटनेते राहुल रेडे पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

श्रीपूर (बारामती झटका)

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीने घन कचरा उचलण्याचे काढलेले टेंडर रद्द करण्याची मागणी गटनेते राहुल रेडे पाटील यांनी सोलापूर जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे ७४ लाख रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे.

वास्तविक पाहता एवढ्या मोठी रक्कम असलेलं टेंडर काढण्याची आवश्यकता नाही. घनकचरा निघत नाही. तसेच घनकचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. सध्या नगरपंचायत हद्दीतील घनकचरा उचलण्यासाठी एक वाहन उपलब्ध आहे. त्याच्या दिवसातून तीन खेपा होतात. नगरपंचायतचे काही प्रभाग विखुरलेले आहेत. तसेच जेथे दाट लोकवस्ती आहे तेथील, घनकचरा उचलण्यासाठी एका गाडीतून तो उचलला जाऊ शकतो. तरी आवश्यक नसताना एवढी मोठी रक्कम घनकचरा उचलण्यासाठी वापरण्यात येऊ नये. तर ते टेंडर रद्द करण्यात यावे अशी लेखी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकॉलमच्या उड्डाणपुलासाठी सारा गाव एकवटला, आता प्लेटचा उड्डाणपूल गावाच्या एकीने हटला.
Next articleप्राची लटके हिची राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेसाठी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here