महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ॲड. विजय रामचंद्र भगत यांची सर्वानुमते स्विकृत निवड करण्यात आली आहे. सदर निवड कार्यकारी अधिकारी धैर्यशील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आदींसह इतर नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. विजय भगत हे सध्या माळशिरस येथील कोर्टात कार्यरत आहेत. जिद्द, चिकाटी आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी यश संपादन केले आहे. ॲड. भगत यांचा बोलका स्वभाव आणि सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली.
ॲड. विजय भगत यांच्या निवडीबद्दल परीसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बारामती झटका परिवाराच्या वतीने ॲड. विजय भगत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng