महाळुंग सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर तर व्हा. चेअरमन हमीद वसान.

स्वर्गीय कुंडलिकभाऊ रेडे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्था प्रगतीपथावर चालणार – मौलाभाई पठाण

महाळूंग ( बारामती झटका )

तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी महाळुंग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर तर व्हाईस चेअरमनपदी हमीद वसान यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
महाळुंग विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन संचालकांची निवड बिनविरोध झाली. चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी सोसायटीच्या ऑफिसमध्ये संचालकांची बैठक आयोजित केलेली होती. त्यामध्ये राजेंद्र उर्फ बंडू वसंतराव वाळेकर यांची चेअरमनपदी तर हमीद वसान यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बिनविरोध निवडून आलेले संचालक दादा लाटे, अनिल मुंडफणे, संजय भगत, दत्तात्रय लाटे, शशांक मुंडफणे, वजीर डांगे, चंद्रकांत खंडागळे, राजेंद्र वाळेकर, वंदना भगत, अनिता रेडे, हमीद वसान, नागनाथ भोसले, संदिपान काळे यांची संचालकपदी निवड झालेली आहे. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र सावंत पाटील, नानासाहेब मुंडफणे, अनिल जाधव, राहुल रेडे, शिवाजी रेडे, माजी चेअरमन वजीर डांगे, विलास हक्के, सुरेश गुंड पाटील, गणेशकर काका, मौला पठाण, पोपट कदम, नामदेव पाटील, रावसाहेब सावंत पाटील, तात्या मुंडफणे, संजय भगत, रमेश देवकर, बासू डांगे, दत्तूनाना रेडे, भीमराव रेडे, बंडू काळे आदी मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.

महाळुंग सेवा सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय कुंडलिकभाऊ रेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे सुरु होती, त्यापश्चात सुद्धा सुरू आहे. कुंडलिक भाऊ यांनी घालून दिलेला आदर्श यावरच संस्था प्रगतीपथावर चालणार आहे, असे मौलाभाई पठाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. सर्व बिनविरोध संचालक, मार्गदर्शक यांचे सत्कार करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउन्हाळा हंगाम चारा टंचाई व त्यावरील उपाय भाग – २ सतिश कचरे मंडल कृषि अधिकारी
Next articleथेट जनतेतील सरपंचाची ठेकेदाराने लायकी काढून थेट आई बहीण काढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here