श्रीपूर ( बारामती झटका )
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत पंधरा प्रभागात महाळुंगचे नेते भीमराव पाटील उर्फ पाटील नाना यांनी पंधरा उमेदवार निवडले आहेत. प्रभाग सतरा व सोळामध्ये उद्या संध्याकाळी दोन उमेदवार निवडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. गेली दोन वर्षे पाटील नाना यांनी महाळुंग व श्रीपूर भागात मोठा जनसंपर्क वाढवला आहे. तळागाळातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते वैयक्तिक लक्ष देत आहेत. सामाजिक पातळीवर त्यांनी प्रत्येक घटकातील व्यक्तींच्या प्राथमिक अडचणी, कौटुंबिक वाद, गोरगरिबांच्या मुलींचे विवाह यांना त्यांनी त्यांच्या पध्दतीने फुल नाही फुलाची पाकळी या तत्वावर सहकार्य केले आहे. पाटील नाना यांचे सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते, संघटनेचे कार्यकर्ते यांच्याशी सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. सर्वच घटकातील प्रत्येक व्यक्तींच्या सुखदुःखात ते सहभागी असतात. नानांकडे गेलं की आपल्याला हमखास न्याय मिळणारच अशी भावना नागरिकांची आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती मदत नेहमीच राहिली आहे. त्यांनी कधीही विशिष्ट गट, जात, धर्म पाहिला नाही. अत्यंत लोकप्रिय व्यक्तीमत्व, खंबीरबाणा, धाडसी स्वभाव आणि तितकाच मनमिळाऊ स्वभाव यामुळे भीमराव पाटील उर्फ पाटील नाना हे नगरपंचायतीच्या
माध्यमातून या भागांचा विकास करतील. त्यांच्याकडून परिवर्तनाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे. भीमराव पाटील उर्फ पाटील नाना यांनी तळागाळातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच नगरपंचायतीच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहचत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng