महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणी पूर्वीच पुणेकरांकडून आमदार पदीच्या शुभेच्छा बॅनरने लक्ष वेधले…

कसबा पोट निवडणुकीत चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार उत्सुकता शिगेला पोहोचली…

पुणे ( बारामती झटका )

पुणे कसबा येथील पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्री. रवींद्र भाऊ धंगेकर यांचे पुणेरी पाटीमध्ये मतमोजणी पूर्वीच आमदार म्हणून बॅनर लागलेले असल्याने अनेकांचे लक्ष बॅनर वेधून घेत आहेत. कसबा पोट निवडणुकीत चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.

कसबा विधानसभा मतदार संघ पुणे या मतदारसंघात एकूण मतदार 02 लाख 75,428 मतदार आहेत. महिला मतदार 01 लाख 38 हजार 550 मतदार पुरुष मतदार 01 लाख 36 हजार 873 मतदार दिव्यांग मतदार 556 मतदार तृतीयपंथी 05 मतदार असे मतदार आहेत‌. कसबा मतदार संघातील जातनिहाय माहिती अशी ब्राह्मण 36 हजार 494, मराठा व कुणबी 65 हजार 690, इतर मागासवर्गीय 86 हजार 622, मुस्लिम 28,928 अनुसूचित जाती जमाती 36 हजार 634 इतर जाती धर्मीय 31 हजार 068 असे मतदार आहेत.

त्यापैकी 45.25% मतदान झालेले आहे. यामध्ये प्रमुख लढत भाजपचे हेमंत रासने व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये झालेली असून एकूण 13 उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. मतदान होऊन भवितव्य मतपेटीमध्ये बंद असतानाच रवींद्र भाऊ धंगेकर यांची कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा बॅनर येणा-जाणाराचे लक्ष वेधून घेत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. रोहन शेटे आणि चि.सौ.कां. शितल लिगाडे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
Next articleExactly what is a Virtual Info Room?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here