महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांची तोफ माळशिरस तालुक्यात धडाडणार.

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना बळीराजा हुंकार यात्रेच्या भव्य शेतकरी मेळाव्याचे लागले वेध

माळशिरस तालुक्‍यातील बळीराजाला शेतकऱ्यांचे आराध्यदैवत बळीराजाचा पांडुरंग शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या आगमनाची प्रतीक्षा…

माळशिरस (बारामती झटका )

शेतकऱ्यांचे आराध्यदैवत माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर बळीराजा हुंकार यात्रा सुरु केलेली आहे. अनेक ठिकाणी उदंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टी व इतर मित्र पक्षांचे सरकार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार आहे. केंद्र व राज्य सरकारची शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असणारे कायदे व ध्येयधोरणे यांच्या विरोधात माळशिरस तालुक्यात राजू शेट्टी यांची महाविकासआघाडी मधुन बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच निमगाव पाटी येथे तोफ धडाडणार आहे. अनेक शेतकरी व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे की, शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांची तोफ कोणकोणत्या मुद्द्यावर धडाडणार आहे.

देशासह महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आराध्यदैवत बळीराजाचा पांडुरंग शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांचे बळीराजा हुंकार यात्रेचे आगमन माळशिरस तालुक्यात होणार असल्याने माळशिरस तालुक्यातील बळीराजा आगमनाच्या प्रतीक्षेत आहे. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना बळीराजा हूंकार यात्रेच्या भव्य शेतकरी मेळाव्याचे वेध लागलेले आहे.
अखंड भागवत धर्माचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशी वेळी अनेक ठिकाणावरून संतांच्या पालख्या पायी चालत येत असतात. अशावेळी पांडुरंगाच्या भेटीला वैष्णव आतुर झालेले असतात. हुंकार यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा पांडुरंग शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गावागावात बांधाबांधावर येत आहे त्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बळीराजासाठी रस्त्यावरची लढाई करणारा एकमेव नेता म्हणजे राजू शेट्टी. त्यांच्या हुंकार यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

बळीराजा हुंकार यात्रा गुरुवार दि. 21/4/2022 रोजी माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी, विझोरी, पुणे-पंढरपूर रोड येथे सायंकाळी 6 वाजता भव्य शेतकरी मेळावा माजी खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदरच्या मेळाव्यामध्ये केंद्र सरकारने दूध, भाजीपाला व फळांचे सहित सर्वच पिकांना हमी भाव कायदा लागू करावा, शेतीपंपाचे भार नियमन त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना 10 तास वीज उपलब्ध करून द्यावी, राज्य सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील दुरुस्ती मागे घ्यावी, राज्य सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली बेकायदेशीर मोडतोड मागे घ्यावी व शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, डिझेल, पेट्रोल दरवाढ कमी झाली पाहिजे, अशा अनेक प्रमुख मागण्यांसह भव्य शेतकरी मेळाव्यांचे आयोजन माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैय्या बोरकर यांच्यासह भीमराव फुले जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक कमलाकर माने देशमुख, युवा जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव मदने, ज्येष्ठ नेते मदनराव काळे, ज्येष्ठ नेते अजित कोडग, युवा तालुका अध्यक्ष शिवाजी चव्हाण, स्वाभिमानी पक्ष तालुका अध्यक्ष मदनसिंह जाधव, माजी जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, युवा जिल्हा उपाध्यक्ष शिवराम गायकवाड, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष साहिल आतार, माळशिरस विधानसभा प्रमुख दत्ता भोसले, तालुका उपाध्यक्ष शिराज तांबोळी, युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष सचिन देवकाते, तालुका कार्याध्यक्ष महेश भाकरे, समाधान काळे, सचिन पवार, तेजस भाकरे पाटील, आहिल पठाण, सचिन बोरकर, प्रदीप ठवरे पाटील, विजय वाघंबरे, प्रवीण काळे आदी कार्यकर्ते मेळावा यशस्वी करण्याकरता प्रयत्न करीत आहेत.

हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. सुसज्ज व्यासपीठ, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था, पार्किंगची सोय अशा अनेक सुखसोयींनी जय्यत अशी तयारी तालुका अध्यक्ष अजित बोरकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleTop 40 Best https://kstennislife.com.pl/category/szkolki-tenisowe/ Selling Artists
Next articleउन्हाळी हंगाम व हिरवा चारा (हायड्रोफोनिक) भाग-१ – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here