महावितरणचा धक्कादायक प्रकार : मिटरचे रेडींग झिरो मात्र बिल पंचवीस हजार रुपये.

महावितरणचा गोंधळ चव्हाट्यावर, वापर नसलेल्या मिटरचे बील आकारून सर्वसामान्य माणसाला वितरण कंपनीचा शाॅक.

मांडवे ( बारामती झटका )

माळशिरस येथील महावितरण कार्यालयातील संबंधित अधिकारी यांना मागील दोन महिन्यांपासून वारंवार भेटून देखील तसेच संबंधित अधिकारी कायम रजेवर असताना ज्या अधिकाऱ्याकडे चार्ज आहे, पदभार असणारे देखील सदरचे प्रकरण मंजूर करत नाही. टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. प्रत्येक वेळी तुमचे प्रकरण सोमवारी क्लिअर होऊन जाईल,असे संबंधित अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मी वयस्कर असताना देखील मला संबंधित अधिकारी प्रत्येक सोमवारी ऑफिसला बोलावून घेतात आणि ऑफिसमध्ये दिवसभर बसून देखील माझ्या प्रकरणावर सही करत नाहीत. तसेच मी दिलेल्या अर्जावर आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही.

अशा प्रकारे पिडीत वयोवृद्ध मांडवे गावचे लतीब हुसेन तांबोळी यांची महावितरणकडून हेळसांड केलेली आहे.
महावितरणचे पिडीत ग्राहक लतीब हुसेन तांबोळी यांनी चुकीचे बिल आकारणी केल्याबद्दल तक्रारी अर्ज केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की, मांडवे ता. माळशिरस गावचा रहिवासी असून माझ्या स्वतःच्या नावे वीज कनेक्शन घेण्यासाठी मी दि. 05/04/2018 रोजी कार्यालयांमध्ये आपल्या गावातील 1500 रुपये कोटेशन पावती भरलेली आहे. सदर कोटेशनच्या आधारे माझ्या घरी कनेक्शन जोडण्यात आले होते. परंतु, आर्थिक अडचणीमुळे मी वीज बिल भरू शकलो नाही. तेव्हा आपले कार्यालयाकडील अधिकारी, वायरमन यांनी माझे वीज कनेक्शन ऑगस्ट सप्टेंबर 2018 मध्ये कट केले होते. तेव्हापासून आम्ही माझे वडील श्री. हुसेन तांबोळी यांचे नावे रजिस्टर असलेले वीज कनेक्शनमधून वीज वापर करत आहे.

परंतु मागील एक वर्षापासून पालखी महामार्गाचे रुंदीकरण करणे चालु असून सदर रस्ता रुंदीकरणामध्ये माझे घर पाडण्यात आले आहे. त्यामुळे मी माझे दुसरे घर बांधले आहे. माझ्या राहत्या घराचे वीज कनेक्शन घेण्यासाठी मी आपल्या या कार्यालयांमध्ये वारंवार येत आहे. परंतु आपले कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच माझ्या नावावर सन 2018 मध्ये रजिस्टर असलेले वीज कनेक्शन हे ऑगस्ट सप्टेंबर 2018 मध्येच कट केले असून देखील मला दि. 05/04/2022 रोजी आपल्या कार्यालयाकडून 25 हजार रुपये थकित असलेले वीज बिल देण्यात आलेले आहे. सदरचे बिल हे दि. 19/04/2022 या तारखेपर्यंत भरण्याची मुदत आहे. जर आमचे वीज बिल कनेक्शन ऑगस्ट, सप्टेंबर 2018 मध्ये कट केलेले आहे तर मग मागील सुमारे चार वर्षापासून चालू रीडिंग व बिलामध्ये देण्यात आले 00 अंक असलेले रीडिंग कसे घेण्यात आले आहे.

तसेच जर वीज वीज कनेक्शन सन 2018 आहे तर मग वीज पुरवठा सन 2014 पासून कसा काय करण्यात आलेला आहे. सदर बिलामध्ये मीटर क्र. ०००० असा देण्यात आलेला आहे. सदर बिलामध्ये कट करण्यात आलेले वीज बिल हे कोणत्या मीटरचे घेण्यात आलेले आहे. तसेच ते कोणत्या तारखांना घेण्यात आलेले आहे. जर विज कनेक्शनच ऑगस्ट सप्टेंबर 2018 मध्ये कट करण्यात आले आहे, तर मग मागील रीडिंग दि. 26/02/2020 रोजी कसे काय घेण्यात आलेले आहे. तसेच सदर वीज बिलावर मागील मार्च 2021 पासून झालेला वीजवापर ०० मध्ये देण्यात आलेला आहे. तर मग 2510 रुपये वीज बिल कसे काय आले आहे असे पत्र दिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील जनतेच्या सूखदुखात आ.राम सातपुते यांच्या सहभागाने माणुसकीची दर्शन घडून आत्मीयता निर्माण होत आहे.
Next articleछापा काट्यावर असणारी मांडवे ग्रामपंचायत पुन्हा काट्यावर आल्याने पोट निवडणूक चुरशीची होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here