महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे पुरंदावडे गावातील पीडित महिलेची तक्रार दाखल

पुरंदावडे येथील जनार्दन शिंदे यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल

पुरंदावडे (बारामती झटका)

पुरंदावडे ता. माळशिरस येथील पीडित महिलेने महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे जनार्दन उर्फ बाळू सुखदेव शिंदे रा. पुरंदावडे, ता. माळशिरस, यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. माळशिरस पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार हकीकत अशी आहे की, जनार्दन शिंदे हे पीडित महिलेला नेहमी त्रास देत आहेत. त्यांच्यापासून त्या महिलेच्या जीवाला धोका आहे. सदर महिलेवर सतत दादागिरी करून त्रास देत आहे. तसेच माळशिरस पोलीस स्टेशन व बीट हवालदार यांना जनार्दन शिंदे घाबरत नाही व पिडीत महिलेला सतत भीती दाखवून त्रास देत आहेत.

त्यामुळे जनार्दन उर्फ बाळू सुखदेव शिंदे यांना पोलीस डिपार्टमेंटकडून समज द्यावी व पोलीस खात्यात माळशिरस कोर्टात फक्त ताकीद द्यावी आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. तुरुंगातून सुटल्यानंतर पीडित महिलेला परत त्रास झाल्यास सदर महिलेला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जनार्दन शिंदे यांच्यावर 354 कलम लावण्यात यावे. तसेच पोलीस खात्याने खडक कारवाई करावी, अशी विनंती या पीडित महिलेने केली आहे. तरी रूपालीताई चाकणकर यांच्याकडे पीडित महिलेने तक्रार दाखल केल्याने रूपालीताई चाकणकर आणि माळशिरस पोलीस स्टेशन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपाणीपुरवठा टेंडर प्रक्रियेत अनियमितता, कार्यकारी अभियंता कोळी यांच्यावर काय कारवाई होणार ?
Next articleग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमधील मृणाल महेशकुमार मोरेची इस्रो येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here