इंडियन गेनसईरियु कराटे असोसिएशन ऑफ सोलापूर यांचा माता भगिनींसाठी स्तुत्य उपक्रम.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते येथे इंडियन गेनसईरियु कराटे असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्य करणाऱ्या महिला व कराटे खेळात यश मिळवलेल्या महिला मुलींचा सत्कार समारंभ कार्यक्रम नातेपुते येथील डॉ. बा.ज. दाते प्रशाला येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन माळशिरस तालुका स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षिका सविता राऊत यांनी केले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून युगंधरा सखी मंचच्या अध्यक्षा अश्विनी दोशी, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता होरा, सखी मंचच्या सचिव सीमा गांधी, ॲड. रजनी गाडे,उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कराटे खेळातील मुला-मुलींनी कराटे फाईट, कीक, पंच, काताज, स्वतःचा बचाव कशाप्रकारे करायचा याचे प्रात्यक्षिके प्रमुख पाहुणे व उपस्थित महिला पालक यांच्यासमोर सादर केली.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कराटे खेळाडू ब्लॅक बेल्ट भक्ती परचंडेे, जानवी सोनवळ, तेजस्विनी शिरतोडे, धनश्री लाळगे, काजल ठेंगल तसेच श्रेया पवार, वैष्णवी पदमन, तन्वी बरडकर, क्षितिजा पवार, अदित्य आदलींगे, प्रविण ढोंबाळे यांना मानाचे फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तसेेच कराटेेे खेळातील विद्यार्थी यांचेे उपस्थित महिला पालक यांचाही पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलत असताना सखी मंचच्या अध्यक्षा म्हणाले की, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात सहभाग घेतला पाहिजे शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत काळानुसार स्वतःमध्ये बदल करून घेतला पाहिजे व स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाचे धडे घेतले पाहिजे असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी डॉ. नम्रता व्होरा, सीमा गांधी, रजनी गाडे,सत्यशीला परचंडे, पूनम गांधी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कराटे प्रशिक्षिका सविता राऊत यांनी केले सूत्रसंचालन व आभार सृजनी सोनवळ यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng