मांडकी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील प्रगतशील बागायतदार सामाजिक कार्याची आवड असणारे पांडूरंग रामचंद्र रणनवरे यांचे दि. १४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे.
त्यांच्यावर मांडकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.
स्वर्गीय पांडुरंग रणनवरे उत्कृष्ट शेतकरी असून त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती. सामाजिक व धार्मिक कार्यात हिरहिरीने भाग घेत असत.
पांडुरंग रणवरे यांच्या दुःखद निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबाला द्यावो मृतात्म्यास शांती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng