माळशिरस पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, माळशिरस येथे उप अभियंता पदावर नियुक्ती.
माळशिरस ( बारामती झटका )
मांडकी ता. माळशिरस गावचे सुपुत्र शांत व संयमी स्वभाव, प्रशासनात शिस्तप्रिय असणारे अशोकराव अण्णासाहेब रणनवरे यांना उप अभियंता पदी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बढती मिळालेली आहे. त्यांची माळशिरस पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस येथे उप अभियंता पदावर नियुक्ती झालेली आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मांडकी गावांमधील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबामध्ये अशोकराव यांचा जन्म झालेला होता. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय व पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस येथे 1985 साली कनिष्ठ अभियंता पदावर नोकरीला सुरुवात केली. 2008 साली शाखा अभियंता पदावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंढरपूर येथे काम केले. 2016 साली जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस येथे पुनश्च बदली झालेली होती. अशोकराव रणनवरे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन व मराठा सेवा संघ माळशिरस तालुका अध्यक्षपदी काम केलेले आहे. उप अभियंता शिवकुमार कुपल यांची बदली पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इंदापूर येथे झालेली होती. शिवकुमार कपल यांनी दि. 13/8/2021 रोजी उप अभियंता पदाचा प्रभारी पदभार अशोकराव रणनवरे यांच्याकडे दिलेला होता. अशोकराव रणवरे यांची पदोन्नती शाखा अभियंता पदावरून उप अभियंता पदावर झालेली होती त्यांची शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माळशिरस पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस येथे उप अभियंता पदी नियुक्ती केलेली आहे. अशोकराव रणनवरे यांच्याकडील प्रभारी असणारा पदभार कायम झालेला असल्याने त्यांचा अनेक स्तरातून सन्मान होत आहे. कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त झालेले उप अभियंता पदी निवड झालेले माळशिरस तालुक्यातील ते एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित एक ते दीड वर्षाचा कालावधी या उपविभागात काम करण्याची संधी मिळालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng