माळशिरस ( बारामती झटका )
मांडकी ता. माळशिरस येथील रणनवरे इनामदार यांच्या ‘शंकररत्न निवास’ या वास्तूचा गृहप्रवेश सत्यनारायण महापूजा सोमवार दि. १४ फेब्रुवारी २२ रोजी संपन्न झाली. वास्तुशांती कार्यक्रमास अनेक नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय नेते मंडळी यांनी उपस्थित राहून रणनवरे इनामदार परिवार यांना शुभेच्छा दिल्या. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठनेते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपत तात्या वाघमोडे यांनी सौ. शोभाताई व श्री. दत्तात्रय रणनवरे इनामदार, सौ. साधना व श्री सचिन रणनवरे इनामदार, सौ. धनश्री व श्री रणजीत रणनवरे इनामदार यांना घराला शोभेल अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.

मांडकी ता. माळशिरस येथील रणनवरे इनामदार परिवार सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून तीन पिढ्या निष्ठेने राहिलेले आहेत. दत्तू काका यांचे वडील सरपंच स्वतः सरपंच मुलगा सचिन सरपंच अशा तीन पिढ्यांनी गावचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर या कारखान्यावर दत्तूकाका संचालक आहेत तर शिवामृत दूध उत्पादक सहकारी संस्था या संस्थेवर सचिन संचालक आहेत. दत्तू काका माळशिरस तालुक्याचे जाणते राजे जयसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत तर, माळशिरस तालुक्याचे राजकीय चाणक्य धैर्यशील मोहिते-पाटील यांचे विश्वासू सचिन आहेत.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ आदलाबदल झाली मात्र, रणनवरे इनामदार परिवार यांनी मोहिते पाटील यांची साथ कधीही सोडली नाही. दत्तूकाका यांचा जुना इनामदार वाडा आहे वाड्यामध्ये भाऊबंद राहत होते. मांडकी पंचक्रोशीतील न्याय-निवाडा सदर ठिकाणी होत होता. जागा अपुरी असल्याने अडचण होत होती. सचिन यांच्या सुपीक डोक्यातून त्यांनी गावाच्या बाहेर शेतामध्ये ‘शंकररत्न निवास’ या वास्तूची उभारणी केली. त्यांच्याच शेजारी नातेपुते पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे चुलत बंधू पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रणनवरे इनामदार यांनी बंगला बांधलेला आहे. दोन्ही वास्तूंचा गृहप्रवेश व सत्यनारायण पूजा एकाच दिवशी ठेवलेली होती. विशेष म्हणजे दोघांचे स्नेह भोजन आलेले मित्र परिवार व नातेवाईक यांना एकत्र ठेवलेले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng