माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा जिवाभावाचा मित्र नंदकुमार लवटे यांना शुभेच्छा.
मांडवे ( बारामती झटका )
मांडवे तालुका माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेले कर्तुत्वाने नावारूपाला आलेले पैलवान नंदकुमार बापूराव लवटे यांचा वाढदिवस 1 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला.
मांडवे गावांमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये नंदकुमार यांचा जन्म झालेला होता सुरुवातीपासून पैलवान की चा नाद सुरुवात सदाशिवनगर येथे केली होती त्यानंतर गंगावेस तालीम या ठिकाणी काही दिवस सराव केला यानंतर शिवनेरी तालीम अकलूज येथे पैलवान कीचे मेहनतीचे काम सुरू होते अंगामध्ये चपळता बलदंड शरीर लहान वयात मोठ्या पैलवान सोबत कुस्ती मध्ये नंदकुमार बाजी मारत असत घरची परिस्थिती बेताची असताना पैलवान की सोबत शिक्षण पहिली ते बारावी कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर येथे केलेले आहे त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे सामाजिक कार्याची आवड होती अशा मध्येच माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुते यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती त्यावेळेस नंदकुमार लवटे आणि एडवोकेट राहुल लवटे यांनी राम सातपुते यांच्या सामाजिक कार्यांमध्ये सहभाग नोंदवलेला होता.

लवटे बंधू आणि राम सातपुते यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले होते अनेक वेळा लवटे यांच्या निवासस्थानी राम सातपुते यांनी उपस्थिती दर्शवली होती. माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुते यांना भारतीय जनता पार्टी कडून विधानसभेची उमेदवारी मिळालेली होती. त्यावेळेला माळशिरस तालुक्यांमध्ये अनेक विश्वासू सहकारी होते त्यापैकी रामलक्ष्मणाची जोडी असणारे राहुल आणि नंदकुमार हेही निवडणुकीच्या रणधुमाळीत सहभागी होते माळशिरस तालुक्यातील जनतेने सर्व सामान कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते असणारे राम सातपुते यांना आमदार बनवले आमदार राम सातपुते आणि लवटे परिवार यांचे ऋणानुबंध अधिक दृढ झालेले आहेत. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय व दमदार आमदार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते दौऱ्यावर असल्याने त्यांनी जिवाभावाचा सहकारी नंदकुमार लवटे यांना भ्रमणध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नंदकुमार लवटे यांच्या मित्रपरिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केलेला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng