मांडवे ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील मांडवे गाव या ठिकाणी ग्रामपंचायत शेजारी असलेले मारुतीचे मंदिर हे गावचे आराध्य दैवत समजले जाते. छोट्यातल्या छोट्या खेडेगावामध्ये सुसज्ज अशी मंदिरे असतात परंतु, मांडवे गाव हे खूप मोठे असून या गावात मोठे आणि शिखर असणारे एकही मंदिर नव्हते, अशी खंत मांडवे गावचे माजी सरपंच तानाजी पालवे यांना वाटत होती. त्यांनी पुढाकार घेतला व गावाची शोभा वाढवण्यासाठी गावचे आराध्य दैवत असणारे हनुमान मंदिर हे शासनाचा पाठपुरावा करून तीर्थक्षेत्र आराखडा यामधून ५१ फुटी शिखर असणारे दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर उभा केले. त्यामुळे चौकाची शोभा कमालीची वाढली आहे. हे भव्य दिव्य असे मंदिर तानाजी पालवे यांच्या पुढाकाराने आणि मांडवे ग्रामस्थांच्या सहकार्याने आज पुर्ण होत आहे. यामुळे गावाची असणारी ही उणीव भरून निघाली आहे. त्यामुळे तानाजी पालवे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, असे देखील अर्जुन दुधाळ म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तानाजी पालवे म्हणजे कोणतेही काम असो ते तडीस नेणारा नेता अशीच ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून गावामध्ये खूप समाज विधायक कामे आजवर झाली आहेत. यापुढे देखील त्यांच्या दूरदृष्टीने जास्तीत जास्त कामे होतील, यात कोणतीही शंका नाही असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng