मांडवे गावातील संग्रामसिंह मोहिते पाटील सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी सुरेश साळुंखे सर तर, व्हाईस चेअरमनपदी अजिनाथ दुधाळ यांची निवड

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची बिनविरोध परंपरा कायम.

मांडवे ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार युवानेते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवे गावातील संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापनेपासूनची बिनविरोध संचालक मंडळ, चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडलेल्या आहेत.

चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकेक अर्ज आलेला असल्याने सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे यांनी सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश साळुंखे सर तर व्हा. चेअरमन पदी अजिनाथ दुधाळ यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव लक्ष्मण तवटे यांनी केलेले होते.

संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना 2014 साली झालेली आहे. संस्थेचे सभासद 525 आहेत, संस्थेचे खेळते भागभांडवल 19 लाख रुपये आहे. कर्ज वाटप 55 लाखाच्या आसपास असते. विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध संचालकपदी रामदास कर्णे, शिवाजी साळुंखे, भीमराव शिंदे, संजय साळुंखे, बाबासाहेब साळुंखे, मारुती कणसे, महादेव गायकवाड, दत्तात्रय साळुंके, आनंदा पालवे, सुरेखा दुधाळ, लक्ष्मीबाई मोरे यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त चेअरमन सुरेश साळुंखे सर म्हणाले की, माझ्यावर संस्थेचे मार्गदर्शक, संचालक मंडळ आणि सभासद यांनी विश्वास टाकून माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात सोसायटीच्या सभासदांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच सर्वांच्या बिनविरोध निवडी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

यावेळी कुमार पाटील, पांडुरंग दुधाळ, विठ्ठल दुधाळ, दामोदर दुधाळ, संजय दुधाळ सर, श्रीमंत दुधाळ, अमित कर्णे, राहुल दुधाळ, अर्जुन दुधाळ, संदीप दुधाळ, संपत दुधाळ, प्रकाश दुधाळ, संतोष बंदुके, अमित बंदुके आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनीरा देवधर धरणाचे पाणी माळशिरस तालुक्यातील 16 गावाला लिफ्ट पद्धतीने देणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
Next articleHow to north american baptist find Activity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here