मांडवे गावात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती साजरी

मांडवे (बारामती झटका)

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती मांडवे गावात ग्रामपंचायत कार्यालय, उमाजी नाईक चौक आणि खंडोबा नगर या ठिकाणी उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमाजी नाईक यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल उजाळा देण्यात आला. उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्य क्रांतीकारक होते.

इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे व क्रांतीचे स्वप्न पाहणारे निधडे वीर म्हणजे राजे उमाजी नाईक होय. पण इतिहासाने उमाजी नाईक यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही. वयाच्या ४३ व्या वर्षी देशासाठी फाशीवर जाणारे ते महान देशभक्त होते. म्हणून त्यांना जयंतीनिमित्त समस्त ग्रामस्थांच्या वतीने वंदन करण्यात आले.

यावेळी मांडवे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि जयंती समीतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंचायत समितीतील रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांची लूट – बाळासाहेब सरगर
Next articleगणेश उत्सवाच्या अनुषंगाने अवैद्य धंदे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या 19 इसमांना तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here