मांडवे गावात पालवे यांच्या राजकीय घराणेशाहीचा गड सिद यांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केला.

पोटनिवडणुकीत मांडवे गावचे प्रस्थापित माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच जयवंत पालवे यांच्या भावजय सौ. पुष्पावती पालवे यांच्या गावच्या पाहुण्या सौ. शोभाताई सिद यांच्याकडून पराभव

मांडवे ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी राजकीय ग्रामपंचायत व तालुक्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असणार्या मांडवे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मांडवे गावातील प्रस्थापित असणारे राजकीयदृष्ट्या सर्वात मोठे घराणे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच जयवंत पालवे यांच्या भावजय सौ. पुष्पावती पालवे यांचा मांडवे गावामध्ये बाहेर गावावरून आलेल्या सिद परिवारातील सौ. शोभाताई सिद यांनी पराभव करून माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच पॅनल प्रमुख यांच्या सहकार्याने राजकीय घराणेशाहीच्या गडाला सुरूंग लावून राजकीय गड उद्ध्वस्त केल्याची माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मांडवे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत जय श्रीराम पॅनलचे प्रमुख जयवंत पालवे व जय हनुमान पॅनलचे प्रमुख तानाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पुष्पावती पालवे व सौ. शोभाताई सिद यांच्यात समोरासमोर लढत झालेली होती. 915 मतदारांपैकी 814 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये 432 पुरुष व 382 स्त्रियांनी मतदान केले होते. त्यापैकी जय श्रीराम पॅनलच्या सौ. पुष्पाबाई हणमंत पालवे यांना 396 तर जय हनुमान पॅनलच्या सौ. शोभाताई नाथा सिद यांना 418 मते पडलेली आहेत. सहा मतदारांनी कोणालाच नको असे मतदान केलेली आहे.

मांडवे गावातील वार्ड क्रमांक चार जयवंत पालवे यांचा बालेकिल्ला ग्रामपंचायत निवडणूकीत तिन्ही उमेदवार निवडून आलेले होते. त्यापैकी नागराबाई जयवंत पालवे यांनी सौ. धनश्री तानाजी पालवे यांचा 84 मतांनी पराभव केलेला होता. सर्वोच्च न्यायालयाने सौ‌ नागराबाई पालवे यांचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे वार्ड क्रमांक चार मधील पोटनिवडणूक लागलेली होती. जयवंत पालवे यांच्या जय श्रीराम पॅनल मधील कार्यकर्त्यांना आत्मविश्वास होता, गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जास्त मताने सौ. पुष्पावती पालवे यांचा विजय होईल. मात्र, मतदारांनी सौ. शोभाताई सिद यांच्या रूपाने आत्मविश्वास धुळीला मिळवला आहे.

जयवंत पालवे यांनी मांडवे गावचे पंधरा वर्ष सरपंच पद, पाच वर्ष उपसरपंच पद, माळशिरस पंचायत समितीचे सदस्यपद पाच वर्ष, त्यांचे बंधू हनुमंत पालवे यांची सून पंचायत समिती सदस्या, पत्नी नागराबाई 14 महिने ग्रामपंचायत सदस्या अशी राजकीय कारकीर्द असूनही मांडवे गावचे सरपंच व उपसरपंच व सदस्य सोबत असताना भावजय पुष्पावती पालवे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

वार्ड क्रमांक 4 मध्ये 200 पालवे, 25 सिद, 50 टेळे, 106 रुपनवर धनगर समाजाचे मतदार होते. 75 गेजगे ढोबळे होलार समाजाचे होते. जगदाळे मराठा 27 व इतर असे मतदार होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी तानाजी पालवे यांच्या धर्मपत्नी सौ. धनश्री पालवे उभ्या असताना राजकीय गणित बिघडलेले होते. त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. मात्र, पोटनिवडणुकीत सर्व गणिते जुळवलेली होती. पालवे, सिद, रुपनवर, टेळे यांचा व्यवस्थित मेळ घालून विशेष होलार समाजाचे एक गट्टा मतदान मिळालेले असल्याने सौ. शोभाताई सिद यांच्या विजयामध्ये समाजातील भावभावकी व पैपाहुणे यांच्या मतांबरोबरच होलार समाजाची चांगली साथ मिळालेली असल्याने 84 मताचे जय श्रीराम पॅनलचे गत वेळचे असणारे लीड तोडून 16 मतांनी जय हनुमान पॅनलच्या सौ. शोभाताई सिद विजयी झालेल्या आहेत.

पालवे मांडवे गावचे प्रस्थापित आहेत. सिद बाहेर गावावरून आलेले पाहुणे आहेत. गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सिद निटवेवाडी वरून मांडवे गावात येऊन त्यांनी जमिनी खरेदी करून वास्तव्यास राहिलेल्या आहेत. शेती व दुग्ध व्यवसाय, शेळी, म्हशी, गाई यांचे पालन करून उदरनिर्वाह सुरू आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंब त्यामध्ये श्री. मारुती धोंडिबा सिद, सौ. वैजयंता मारुती सिद, श्री. नाथा मारुती सिद, सौ. शोभा नाथा सिद, श्री. दादा मारुती सिद, सौ. वैशाली दादा सिद, हर्षवर्धन नाथा सिद, सुभाष नाथा सिद, प्रणाली दादा सिद, करण दादा सिद असा परिवार राहत आहे. राजकारणाचा अनुभव नाही मात्र, गोरडवाडी येथील श्री‌ अंबादास नामदेव गोरड व सौ. द्रोपदी अंबादास गोरड यांची कन्या सौ. शोभाताई यांना सासर व माहेर दोन्हीकडीलही राजकीय वारसा नसताना जय हनुमान पॅनलचे पॅनल प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच तानाजी पालवे व वार्ड क्रमांक 4 मधील पालवे, टेळे, सिद, रुपनवर व होलार समाजाच्या सहकार्याने निटवेवाडीवरून येऊन मांडवे गावातील प्रस्थापित पालवे यांचे नीटनेटके करून जयवंत पालवे यांच्या राजकीय घराणेशाहीला सुरुंग लावून राजकीय गड उध्वस्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमांडवे पोटनिवडणुकीत तानाजी पालवे गटाच्या सौ. शोभाताई सिद यांचा दैदिप्यमान विजय.
Next articleदेवेंद्रजी फडणवीस नावालाच विरोधी पक्ष नेते मात्र, विकासाला सत्ताधाऱ्यांच्या पुढे एक पाऊल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here