नूतन ग्रामपंचायत सदस्या सौ. शोभाताई नाथा सिद वार्ड क्रमांक 4 मधील नागरिकांच्या समस्यांचा पाढा वाचणार आहेत.
मांडवे ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्त्वाची समजली जाणारी मांडवे ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पोट निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मासिक मिटिंग संपन्न होत आहे. या मीटिंगसाठी दैदिप्यमान विजय संपादन केलेल्या नुतन ग्रामपंचायत सदस्या सौ. शोभाताई नाथा सिद पहिल्यांदा मासिक मीटिंगसाठी उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीमध्ये त्यांना ग्रामस्थांनी व मतदारांनी सांगितलेल्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतलेल्या आहेत. विजयानंतर नागरिकांच्या वार्ड क्रमांक चारमधील समस्यांचा पाढा ग्रामपंचायतमध्ये वाचणार असल्याचे नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्या सौ. शोभाताई नाथा सिद यांनी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले. यावेळेस त्यांचे पतीराज श्री. नाथा सिद व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मांडवे ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग शुक्रवार दि. 24 जून 2022 रोजी संपन्न होणार आहे. दैदीप्यमान विजय संपादन करणाऱ्या सौ. शोभाताई यांनी पोट निवडणुकीत प्रचाराच्या वेळी अनेक समस्या व अडचणी पाहिलेल्या आहेत. त्याची सोडवणूक कशा पद्धतीने करणार आहे, त्याची माहिती त्यांच्या निवासस्थानी जाऊन जाणून घेतलेली आहे.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ. शोभाताई सिद यांनी सांगितले की, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य तानाजी पालवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व पंचायत समितीमधील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले.
पोटनिवडणुकीच्या वेळी ग्रामस्थांनी व मतदारांनी अनेक समस्या उभ्या केलेल्या होत्या. त्यामध्ये ढोबळे वस्ती, गेजगे वस्ती, गावठाण डीपी स्वतंत्र करण्याची मागणी केलेली होती. 51 फाट्यावरील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मिटविण्याची विनंती होती, पाणी टंचाईसाठी हातपंपाची गरज आहे, जिथे गरज आहे त्या ठिकाणी हातपंप उभारण्याची मागणी आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्न सुरक्षा योजनेपासून खरे लाभार्थी वंचित आहेत, त्या लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेत लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. निराधार व्यक्तींना त्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करावयाचा आहे. गेजगे वस्ती येथे पाणीपुरवठा योजना मंजूर करून प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे, असे अनेक प्रश्न वार्डामधील आहेत. भविष्यात सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे नूतन सदस्या सौ. शोभाताई सिद यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी चर्चा करताना सांगितलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng