मांडवे गावात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमने सामने निवडणूक रंगली
मांडवे ( बारामती झटका )
मांडवे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सन 2022 पोटनिवडणुकीत जय श्रीराम पॅनलच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पाबाई हनुमंत पालवे आणि जय हनुमान पॅनलच्या सौ. शोभाताई नाथा सिद यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. मांडवे ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमने सामने निवडणूक रंगलेली आहे. माळशिरस तालुक्याचे या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे. जय श्रीराम पॅनलचे प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच जयवंत पालवे आणि जय हनुमान पॅनलचे प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच तानाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चुरशीची निवडणूक सुरू आहे.

जय श्रीराम पॅनलच्या उमेदवार सौ. पुष्पाबाई पालवे यांचे पती हनुमंत पालवे सेवानिवृत्त जलसंपदा विभागातील अधिकारी असून पॅनल प्रमुख जयवंत पालवे यांच्या त्या भावजय आहेत. राजकारण व नोकरी यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे.

जय हनुमान पॅनलच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाताई सिद यांचे पती सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. शेतामध्ये काबाड कष्ट करून आपला प्रपंच चालवत आहेत. परिस्थिती साधारण बेताची आहे. जनमताच्या पाठिंब्यावर त्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमनेसामने निवडणूक रंगलेली आहे. दोन्ही पॅनलकडून प्रचार सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. क्रमांक 4 मधील मतदार मात्र स्थिर आहे. निवडणूक रंगात आल्यानंतर मतदारांच्या प्रतिक्रिया सूरू होतील, तेव्हा खरं चित्र स्पष्ट होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
